Amravati Political News : अमरावतीत वंचितच्या वतीने प्रकाश आंबेडकरांचे Prakash Ambedkar बंधू रिपब्लीकन सेनेचे आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देत आपला उमेदवार मागे घेतला. मात्र अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप करत आनंदराज यांनी आपण लढणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या गेल्या आहेत. बंधू आनंदराज यांच्या निर्णयानंतर अमरावतीतून वंचित आता काय भूमिका घेणार, याकडे लक्ष आहे. Anandraj Ambedkar decline support of brother Prakash Ambedkar.
राज्यात वंचितने आतापर्यंत आपले 24 उमेदवार दिले आहेत. त्यातील आनंदराज Anandraj Ambedkar यांच्यासाठी वंचितने अमरावतीतील उमेदवार अर्ज दाखल करणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच पत्र जाहीर करत विनाअट आनंदराज आंबेडकारांना पाठिंबा दिला होता. यासह आता निवडणूक लढा पण माघार घेऊ नका, अशी विनंतीही वंचितच्या वतीने आनंदराज यांना करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेत असल्याचे सांगून प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधाला आहे.
आनंदराज उमेदवारी का माघारी घेत आहेत, याबाबत रिपब्लिकन सेनेच्या Republical Sena वतीने स्पष्टीकरण दिले आहे. त्यात म्हटले, अमरावतीच्या जागेवर आनंदराज यांना वंचितने दिलेले समर्थन हे धादांत खोटे आहे. त्यातून वंचित संविधानप्रेमी जनतेची दिशाभूल करत आहे. नामांकन दाखल करण्याच्या दिवशी वंचितच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आनंदराज यांच्या रॅलीमध्ये सामील होऊ नये, अशा सूचना वजा ताकीद दिल्याची माहिती आहे. तसेच तीन दिवस वाट पाहूनही वंचितने Vanchit आम्हाला पाठिंबा दिला नाही. त्यामुळेच मिळाल्याने उमेदवारी मागे घेत आहे. मतविभागणी होऊन भाजप पुन्हा सत्तेत येऊ नये, म्हणून माघारीचा निर्णय घेतल्याचेही या निवदेनातून स्पष्ट केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा)
वंचितचा आनंदराज यांना काय शब्द होता?
अमरावती मतदारसंघात Amravati आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपल्या उमेदवारीला वंचित पाठिंबा जाहीर करेल. त्यामुळे वंचित आपला जाहीर केलेला उमेदवार मागे घेत आहे. आता आपण अर्ज मागे घेऊ नये व उमेदवारी कायम ठेवावी, अशी विनंतही वंचितच्या वतीने आनंदराज यांना केली होती. मात्र त्यांनी माघार घेतल्याने आता वंचित आणि रिपब्लिकन सेनेत वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.