Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Nana Patole Sarkarnama
विश्लेषण

Loksabha Election 2024 : काँग्रेसकडे उमेदवाराची वानवा, भाजपकडे रीघ तर ठाकरे गटावर दबाव!

Sampat Devgire

BJP Vs Shivsena Politics :

धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा गंभीर वळणावर पोहोचला आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष काँग्रेसकडे ही जागा आहे. मात्र, काँग्रेसकडे प्रबळ उमेदवार नाही तर भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारीसाठी रीघ लागल्याचे चित्र दिसत आहे. भाजपच्या संसदीय समितीकडे दहा इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. यामध्ये विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे, प्रताप दिघावकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास बच्छाव, ॲड. शिशिर हिरे, हर्षवर्धन दहीते, डॉ. माधुरी बाफना, माजी मंत्री राजवर्धन कदमबांडे आदी उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांमध्ये अनेक गट आहेत. यातील काही इच्छुकांचे एकमेकांशी अजिबात जमत नाही. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यावी हा भाजप पुढे तिढा आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघ (Dhule Loksabha Constituency) हा 2009 पूर्वी काँग्रेसचा (Congress) पारंपरिक मतदारसंघ होता. येथून सलग सर्व लोकसभा निवडणुका (Loksabha Election) काँग्रेसने जिंकल्या होत्या. 2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर येथून भाजपचे प्रतापराव सोनवणे विजयी झाले होते. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये भाजपचे डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamre) हे सलग दोन वेळा येथून विजयी झाले.

यंदाच्या निवडणुकीत विरोधी पक्ष काँग्रेसकडे उमेदवारांची वानवा आहे. त्यामुळे भाजपच्या (BJP) सर्वच इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे विद्यमान खासदार डॉक्टर भामरे यांना उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे आणि प्रत्येक इच्छुक कुरघोडीचे राजकारण करत असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

काँग्रेस पक्षाकडे धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे आणि निवृत्त पोलिस अधिकारी अब्दुल रहमान असे तीन उमेदवार आहेत. यातील तिन्ही उमेदवार मतदारसंघातील राजकीय व्यूहरचना आणि सामाजिक तसेच धार्मिक मतांचे ध्रुवीकरण लक्षात घेता फारसे प्रबळ ठरणार नाहीत असे बोलले जाते. अल्पसंख्याक मतांचे ध्रुवीकरण ही यातील सर्वात मोठी राजकीय समस्या आहे. विरोधी पक्षांना या मतांचे ध्रुवीकरण रोखण्याचे आव्हान आहे. त्यामुळे कोणता उमेदवार द्यावा, याची चिंता सध्या काँग्रेसला सतावत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धुळे मतदारसंघातील उमेदवारांच्या या स्थितीमुळे आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष ठाकरे गटा उमेदवार देण्यासाठी दबाव येत आहे. काँग्रेस पक्षाकडे उमेदवार नसल्याने उमेदवार द्यावा यासाठी खुद्द काँग्रेसमधील एक गट सक्रिय झाला आहे. ठाकरे गटातील काही पदाधिकारी धुळे लोकसभा मतदारसंघ वैचारिकदृष्ट्या महाविकास आघाडीशी एकोपा असणारा असल्याने येथे प्रबळ उमेदवार देण्याची आवश्यकता असल्याचे सांगत आहेत.

यासंदर्भात वरिष्ठ नेत्यांसह काही नेत्यांनी चर्चा केली आहे. याबाबत महाविकास आघाडीची 9 मार्चला बैठक होणार आहे. त्यात धुळे मतदारसंघाबाबत उमेदवारी तसेच अन्य विषयाची चर्चा होईल आणि निर्णय घेतला जाईल.

(Edited by Avinash Chandane)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT