Subhash Bhamre : सुभाष भामरेंची उमेदवारी अडचणीत; धुळे मतदारसंघाबाबत भाजपचा रिपोर्ट काय ?

Lok Sabha Election 2024 : अमरीश भाई पटेल फॅक्टर महत्त्वाचा; पक्षांतर्गत विरोधकांचे थेट दिल्लीतून आपल्या उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू केल्याने उमेदवारीचा गुंता वाढला.
Subhash Bhamre
Subhash BhamreSarkarnama
Published on
Updated on

Dhule BJP Politics: महाराष्ट्रातील 23 लोकसभा मतदारसंघांचा अंतर्गत अहवाल भाजपच्या केंद्रीय समितीला सादर झाला आहे. या रिपोर्टच्या माहितीनुसार धुळे लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुभाष भामरे यांची वाट अवघड झाल्याचे बोलले जाते. पक्षांतर्गत विरोधक मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याने लोकसभेसाठी भामरेंच्या उमेदवारीवर राजकीय वर्तुळातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे (Subhash Bhamre) उमेदवारीसाठी जंग-जंग पछाडत आहेत. केंद्रीय निरीक्षकांनी या मतदारसंघात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची व्यक्तिगत चर्चा केली. उमेदवारीबाबत त्यांचे मत जाणून घेतले आहे. त्यानंतर त्यांनी भाजपच्या केंद्रीय समितीला उमेदवारीबाबत अहवाल दिला आहे. या अहवालात खासदार सुभाष भामरे यांसह अन्य दोन नावे देखील कळविल्याचे बोलले जाते. सध्या या अहवालामुळे भामरे उमेदवारीसाठी चिंतीत असल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Subhash Bhamre
Sangram Thopte News : संग्राम थोपटेंची साथ, ताई की वहिनीला ? थेटच सांगितले...

भाजपकडे धुळे (Dhule) लोकसभा मतदारसंघातून अनेक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. यामध्ये माजी मंत्री राजवर्धन कदमबांडे, निवृत्त पोलिस अधिकारी प्रताप दिघावकर (Pratap Dighavkar) यांसह पाच प्रमुख इच्छुक आहेत. या इच्छुकांनी उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार भामरे यांचे पक्षांतर्गत विरोधक सक्रिय झाल्याने त्यांच्या उमेदवारीचा घोळ वाढला आहे.

Subhash Bhamre
Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडीत कोल्हापूरची जागा कोणाला मिळणार? जयंत पाटलांनी उघडले गुपित

धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव शहरातील लक्षणीय अल्पसंख्यांक मते आणि माजी मंत्री अमरीश भाई पटेल (Amarish Patel) हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. भामरे यांच्या विरोधात असलेल्या इच्छुकांनी थेट दिल्ली गाठली आहे. विविध नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या आहेत. यामध्ये अमरीश भाई पटेल यांनी राजवर्धन कदमबांडे यांच्या उमेदवारासाठी आग्रह धरल्याचे बोलले जाते. त्यामुळे उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा असल्याचे चित्र आहे. त्यात 70 वर्षावरील खासदारांना उमेदवारी देऊ नये असा निकष आहे. त्यामुळे डॉ. भामरे यांच्या चिंता वाढल्या आहेत.

धुळे लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस (Congress) पक्षाकडे आहे. त्यामुळे गेल्या चार निवडणुकांमध्ये येथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होत आली आहे. यंदा मात्र मतदारसंघातील चित्र बदलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षात बंडखोरी झाल्यानंतर त्यांची ताकद कमी झाली आहे. या स्थितीत काँग्रेसकडे इच्छुक उमेदवारांची संख्या घटली. त्यामुळे भाजपच्या इच्छुकांतील स्पर्धेमुळे काँग्रेस पक्ष भाजपचा एखाद्या उमेदवाराला आयात करू शकेल का? असा पर्याय देखील पुढे आला आहे. एकंदरच धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपात पक्षांतर्गत राजकीय स्पर्धा टोकाला गेल्याचे चित्र आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Subhash Bhamre
Devendra Fadnavis : फडणवीस यांना संपवण्याची धमकी; किंचक नवलेला अटक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com