Satyajit Tambe News : विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रत्येक वेळी नव्या वळणावर बदलत आहे. काँग्रेसने उमेदवारी जाहीर केलेली असतानाही सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही. तर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे नवा ट्वीस्ट आला होता. त्यामुळे वेळेवर सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसची कोंडी केली होती. मात्र, त्यांनी वेळेवर आपले पत्ते ओपन करत महाविकास आघाडीची कोंडी केली होती. परंतु आता आघाडीने टाकलेल्या डावामुळे तांबेंचा डाव त्यांच्यावरच उलटणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे काँग्रेसला (Congress) निवडणून येणाऱ्या जागेवर पाणी सोडावे लागले. सत्यजीत तांबे हे भाजपचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, सत्यजीत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला एका आंदोलना दरम्यान काळे फासले होते. त्याचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. त्यामुळे तांबे यांच्या पाठिंब्याबाबत भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले असले तरी त्यांनी थेट अजून पाठिंबा जाहिर केलेला नाही.
सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर आपण महाविकास आघाडीचेच (MahaVikas Aghadi) उमेदवार असल्याचे सांगितले होते. मात्र, काँग्रेसने उमेदवारीवर आक्षेप घेतला. तसेच महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे वेळेवर डाव टाकत सत्यजीत तांबे यांनी आपण आघाडीचे उमेदवार आहोत, आणि भाजपनेही आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका घेतील होती. तसेच निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते.
मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) सुद्धा त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपची कोंडी झाली आहे. नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासणाऱ्या उमेदवाराला थेट पाठिंबा द्यायचा का? असा प्रश्न भाजपच्या वर्तुळात चर्चीला जात आहे. त्यामुळे तांबे यांनी खेळलेली खेळी त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.