Raosaheb Danve : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे कोणताही राजकीय वारसा नसतांना बोटावर मोजण्या इतक्या लोकसंख्येच्या गावातून थेट दिल्लीच्या मंत्रालयात पोहचले. गावचा सरपंच ते केंद्रीय मंत्री असा त्याचा राजकीय प्रवास कसा घडला? याचे रंजक किस्से दानवे (Raosaheb Danve) आपल्या भाषणातून सांगत असतात. राजकीय वारसा नसलेल्या दानवेंनी राजकारणात यश मिळवले असले तरी आता मात्र त्यांचे अख्खे कुटुंबच राजकारणी झाले आहे.
पत्नी निर्मला दानवे यांनी विधानसभा लढवली होती, चिरंजीव संतोष दानवे भोकरदन-जाफ्राबादमधून दोन टर्म आमदार आहेत. (Bjp) थोरली मुलगी आशा पांडे जिल्हा परिषद सदस्य, लहान धाकट्या संजना जाधव या देखील जिल्हा परिषद सदस्य आणि आता (Jalna) कन्नडमधून विधानसभा लढण्याची तयारी करत आहेत.
आता दानवेंची आणखी एक मुलगी आणि जालन्याचे राष्ट्रवादीचे माजी आमदार दिवंगत वैजनाथ आकात यांची सून व महेश आकात यांच्या पत्नी उषा आकात (दानवे) या देखील राजकारणात उतरण्याच्या तयारी असल्याची चर्चा जालना जिल्ह्यात सुरू झाली आहे. कारण कधीही राजकीय व्यासपीठावर, कार्यक्रमात न दिसणाऱ्या उषा आकात काल चक्क भाजपच्या व्यासपीठावर उपस्थीत होत्या. त्यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
भाजप महिला मोर्चाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि बहिण आशा पांडे यांच्या शेजारी उषा या गळ्यात भाजपचा रुमाल घालून बसल्या होत्या. त्यामुळे दानवेंच्या तिसऱ्या मुलीचीही राजकारणात एन्ट्री होणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. उषा या परतूर-मंठा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत माजी आमदार वैजीनाथ आकात यांच्या सून आहेत.
दिवंगत माजी आमदार वैजीनाथ आकात परतुर-मंठा विधानसभा मतदारसंघातून १९८५ ते १९९५ असे सलग दोन निवडून आले होते. पहिल्यांदा त्यांनी शरद पवार यांच्या पुरोगामी लोकशाही आघाडीकडून तर दुसऱ्यांदा त्यांनी कॉंग्रेस पक्षाकडून लढवली होती. त्यानंतर ते शरद पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले होते. तेव्हापासुन जालन्यात टोपे कुटूंबा नंतर आकात कुटुंब हे शरद पवाराचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते.
वैजिनाथ आकात यांच्यानंतर त्यांचे पुतणे बाबासाहेब आकात यांनीही विधान सभा निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला होता. आकात यांच्या मुलाला जरी राजकारणात रस नसला तरी आज ही बाबासाहेब आकात यांचा मुलगा कपिल आकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निष्ठा बाळगून आहेत.
असे असतांना त्यांच्या काकू असलेल्या उषा आकात ह्या अचानक भाजपाच्या व्यासपीठावर दिसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे या विधानसभा मतदार संघावर लोणीकर पिता पुत्रांची पकड असतांना दानवे यांनी टाकलेला हा डाव तर नाही ना? आपल्या तिसऱ्या मुलीलाही राजकारणा आणण्याच्या या माध्यमातून त्यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.