Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महायुतीने मुंबई महापालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती. त्यामुळे शिवसेनेत फूट पडल्यापासून मुंबई महापालिकेवर भाजपचा डोळा आहे. त्याचमुळे गेल्या वर्षभरापासून भाजपकडून प्लॅनिंग केले जात आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्याने व एकनाथ शिंदे यांची शिवसेना महायुतीसोबत असल्याने महायुतीला विजय सोपा वाटत होता.
आता ठाकरे बंधू हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून एकत्र आले असल्याने येत्या काळात मनसे व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईमध्ये ठाकरेंची ताकद जास्त आहे. त्यात राज ठाकरेंसोबत संभाव्य युतीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे ठाकरेंची ताकद आणखी वाढणार आहे. अशात महायुतीनेही एकत्र, ताकदीने लढण्यावर भर देत प्लॅन आखला आहे. तर दुसरीकडे ज्या ठिकाणी महायुती शक्य नाही, त्या महापालिकेमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ३१ जानेवारी २०२६ च्या आधी होणार आहेत. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबरनंतर घेण्यात येणार असल्याने जोरात तयारी सुरु आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप (BJP), शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची महायुती एकत्रित लढणार आहे. तर पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढणार आहे. तर या ठिकाणी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार आहे. ठाण्यात भाजप व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत तर याठिकाणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वतंत्रपणे लढणार आहे. त्यामुळे काही महापालिकेत मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेमध्ये ठाकरेंची ताकद जास्त आहे. त्यात राज ठाकरेंसोबत संभाव्य युतीची चर्चा सुरू आहे. त्यामुळे ठाकरेंची ताकद आणखी वाढणार आहे. अशात महायुतीनेही आपल्या बाजूने एकत्र, ताकदीने लढण्यावर भर देण्याचा प्लॅन आखला आहे. ज्या ठिकाणी युती शक्य नाही, त्या मनपामध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत.
. मुंबई मनपा निवडणुकीत ठाकरेंना शह देण्यासाठी महायुतीने एकत्र लढण्यावर जोर दिल्याचे सांगण्यात येतेय. पण काही ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही ठिकाणी भाजप शिवसेना अशी युती होऊ शकते, असे सांगण्यात येतेय. ठाण्यामध्ये शिंदेंनी स्वतंत्र लढण्यावर जोर दिला आहे. तर पिंपरी चिंचवड, पुणे या मनपामध्ये अजित पवार स्वतंत्र लढण्याचा विचार करत आहेत. छत्रपती संभाजीनगर, नागपूर यासारख्या महत्त्वाच्या मनपाबाबत महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
अशी आहे महायुतीची स्ट्रॅटर्जी
मुंबई महापलिका निवडणुकीत महायुतीमधील तीन पक्ष एकजुटीने लढणार आहेत. सर्व तिन्ही घटक पक्ष प्रत्येक वॉर्डमध्ये समन्वय साधून एकत्रितपणे उमेदवार देणार आहेत. त्यासोबतच मतविभागणी टाळण्यासाठी व ठाकरे गटाच्या मतविभागणीचा फायदा घेऊ नये, यासाठी महायुती पूर्ण प्रयत्न करणार आहे. मुंबई महानगरपालिकांसारख्या ठाकरे बंधूंच्या प्रभाव क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.