Mumbai News, 25 Sep : राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. याच पावसामुळे मराठवाड्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. पुराच्या पाण्यामुळे गावंच्या गावं पाण्याखाली गेली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे आता पूरग्रस्त भागातील नागरिकांनी सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मदत करण्यात आली. मात्र, पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे फोटो छापल्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे.
याच फोटोवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर सडून टीका केली. मिंध्यांसारखे लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्या दाढीचे आणि चेहऱ्याचे फोटो टाकून मदत वाटत आहेत आणि राजकारण करत आहेत. लोक मरत असताना आणि आक्रोश करत असताना अशा प्रकारे प्रचाराचे राजकारण करणे हा निर्लज्जपणा आणि अमानुषपणा आहे, असा हल्लाबोल राऊतांनी केला आहे.
शिवाय त्यांच्याकडे एवढा पैसा असेल तर त्यांनी सरकारी मदतीवर स्वतःचे फोटो लावण्याऐवजी, नगरविकास खात्यानं समृद्धी, शक्तिपीठ महामार्गात ठेकेदारांकडून लुटलेले पैसे स्वतःच्या तिजोरीतून काढून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी टीकाही केली.
तर राऊतांनी केलेल्या या टीकेला आता शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला नेत्या शीतल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. म्हात्रे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये कोकणात महापूर आला असता पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात आलेल्या किटवर उद्धव ठाकरेंचे फोटो छापल्याचं दिसत आहे.
यावरून त्यांनी राऊतांसह ठाकरे गटावर निशाणा साधला. शीतल म्हात्रे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं की, 'कोकणात महापूर आलेला असताना उद्धटराव मुख्यमंत्री होते. तेव्हा लाजेखातर का होईना शिल्लक गटाने मदत केलेली, त्याचे हे फोटो. यावर सकाळचा भोंगा काय बोलणार? अला सवाल करत संजय राऊतांवर टीका केली.
तर या मदतीवर कोणाच्या थोबाडाचे फोटो चिकटवले आहेत. यावेळी नेमका काय उद्देश होता. आता उद्धटराव 12 ते 3 पर्यंत मॅटीनी पूरपर्यटन दौरा करतायत. स्वत:च्या पक्षातली लोकं जी दु:ख मनात ठेऊन पक्ष सोडून गेली, त्यांना लोकांची दु:ख 3 तासात काय कळणार?' असा हल्लाबोल करत म्हात्रे यांनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.