Raj Thackeray  Sarkarnama
विश्लेषण

MNS 18th Foundation Day : मनसेला गतवैभव मिळवून देणार नाशिक?

MNS Foundation Day Special Story : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 18 वा वर्धापन दिन. यानिमित्त नाशिकमध्ये पहिल्यांदाच मनसेचा 18 वा वर्धापन दिन मुंबईच्या बाहेर आणि तोही नाशिकमध्ये साजरा होतो आहे.

Arvind Jadhav

Raj Thackeray Latest News in Marathi : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घोषणा राज ठाकरे यांनी मुंबईत केली. पक्षाची ताकद मुंबईतच असे चित्र निर्माण झाले. पण प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये मुंबईच काय पण राज्यातील इतर कोणत्याही शहरापेक्षा अधिक पसंदी नाशिकने मनसेला दिली. पहिल्याच झटक्यात तीन आमदार, 40 नगरसेवक मनसेला नाशिकने दिले. खासदार पडले तेही अगदीच कमी फरकाने. राज ठाकरे यांच्यावर नाशिककरांनी भरभरून प्रेम केलं. राज्यात मनसेच्या सत्तेचा डौलारा उभा राहिला तो नाशिकच्या पायावरच. मात्र, हाच पाया कमकुवत झाला. याचमुळे की काय 18 वर्षांत पहिल्यांदाच मनसेचा वर्धापन दिन मुंबईच्या बाहेर आणि तोही नाशिकमध्ये साजरा होतो आहे.

राज ठाकरे शिवसेनेत असतानाच त्यांनी आपली स्वतंत्र व्यवस्था नाशिकमध्ये उभी केली. आपली माणसे निवडून त्यांच्याकडे शिवसेनेची जबाबदारी दिली. शिवसेनेतून बाहेर पडताना मग कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा राज ठाकरे यांच्यासोबत मनसेत दाखल झाला. शिट्ट्या वाजवणारी मुलेच सभेला येतात, पण मतदान मिळत नाही, हा राज ठाकरे यांच्यावरील ठपका नाशिककरांनी धुऊन टाकला.

पक्ष स्थापन झाल्यानंतर प्रथमच 2009 मध्ये लोकसभा निवडणुका ( Loksabha Election) पार पडल्यात. या निवडणुकीत राज ठाकरे यांनी सध्याचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्यावर विश्वास दाखवला. गोडसे यांना दुसऱ्या क्रमाकांची दोन लाख 16 हजार 674 मते मिळाली, तर समीर भुजबळ यांना दोन लाख 38 हजार 706 मते मिळाली होती. अवघ्या काही हजार मतांनी गोडसेंचा पराभव झाला. अर्थात त्यावेळी शिवसेना, बसपा व इतर छोट्या पक्षांसह अपक्षांमध्ये मतांचे विभाजन झाले होते. मात्र, तरीही विरोधकांकडून राज ठाकरे यांच्या मागे जनता असल्याचे मान्य होत नव्हते. पुढे विधानसभा Vidhan Sabha आणि महापालिका निवडणुकांमध्ये मनसेला अभूतपूर्व यश मिळाले. शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांवर मनसेने झेंडा फडकवला. यात वसंत गिते, नितीन भोसले, दिवंगत उत्तमराव ढिकले यांचा समावेश होता. Maharashtra Navnirman Sena foundation day

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महापालिका निवडणुकांमध्ये मनसेसाठी मोठा चमत्कारच झाला. राज ठाकरे यांनी उच्चशिक्षित उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली. या परीक्षेसह तोंडी परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना तिकिटे देण्यात आली होती. ही परीक्षा त्यावेळी मतदारांना भावली. आपल्यातून निवडून जाणारा नगरसेवक किमान शिक्षित असावा, त्यांच्यावर धाक असावा, हे राज ठाकरे यांचे मत नाशिककरांनी उचलून धरले. तब्बल 40 नगरसेवक त्यावेळी निवडून आले. मात्र, हा आकडा बहुमतापासून दूर होता. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) राज ठाकरे यांच्या मदतीला धावून आले. नाशिककरांची इच्छा आहे. त्यामुळे आपण सत्तेत सहभागी न होता, मनसेला बाहेरून पाठिंबा द्यावा, असा आदेश पवारांनी दिला. यामुळे नाशिक महापालिकेतील मनसेचा सत्तामार्ग विस्तृत झाला. mns vardhapan din 2024

राज ठाकरे (Raj Thackeray) नेहमीच बकाल शहरांचा मुद्दा मांडत. नाशिकची स्थिती बकलावस्थेकडे वाढत असताना राज ठाकरे यांनी स्वत: लक्ष घालून अनेक उपक्रम मार्गी लावले. आज शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखाली जी सुंदर झाडी आणि रंगकाम दिसते, ते राज ठाकरे यांच्यामुळेच! राज ठाकरेंनी त्यावेळी पाठपुरावा केला नसता तर नक्कीच या उड्डाणपुलाखाली मोठ्या स्वरूपात अतिक्रमणे झाली असती. गोदापार्कसाठी ठाकरे यांनी चांगले प्रयत्न केलेत. थकलेल्या शहरवासीयांना निसर्गाचा आनंद घेत फिरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या गोदापार्कसाठी सीएसआर फंडाचा वापर करण्यात आला. ऐतिहासिक शस्त्र संग्रहालय हासुद्धा चांगला उपक्रम होता.

राज ठाकरे यांच्या कल्पना आणि वास्तविक परिस्थिती यात मात्र हळूहळू बदल होत गेला. मुंबईत राहून नाशिकची घोडदाैड सांभाळताना त्यांच्याच नाकीनऊ आले. ही अडचण त्यांनी अनेकदा जाहीर बोलून दाखवली. राज ठाकरे चांगले काही करू शकतात, याची जाणीव आजही नाशिककरांना (Nashik) आहे. राज ठाकरेंचे नाशिकवरील प्रेम आजही कायम आहे. त्याचमुळे त्यांनी पक्षाचा 18 वा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला. 18 वर्षे म्हणजे मनसे mns vardhapan din 2024 पक्ष खऱ्याअर्थाने प्रौढ झाला आहे. या प्रौढपणाचे वैशिष्ट असलेली चपळाई, उत्साहाची कमी सध्या मनसेत असून, आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पक्षातील हीच मरगळ दूर करण्यासाठी राज ठाकरे काय कानमंत्र देतात, याची उत्सुकता सर्वांना आहे.

Edited By : Rashmi Mane

R

SCROLL FOR NEXT