MP, MLA Salary Sarkarnama
विश्लेषण

MPs and MLAs salary : आमदार-खासदारांची कमाई वाढली, जनता बेहाल! हा रिपोर्ट तुमची स्थिती सांगतोय...

MPs and MLAs salary increase​ India Employment Report 2024​ : खासदार-आमदार मालामाल होत असताना सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. वाढलेल्या महागाईच्या तुलनेत हातात येणारा पैसा तोकडा पडत आहे.

Rajanand More

New Delhi News : देशातील खासदारांचे वेतन आणि भत्त्यांमध्ये नुकतीच मोठी वाढ करण्यात आली. महाराष्ट्रातील आमदारांचे आधीच खासदारांपेक्षा जास्त वेतन आहे. एकीकडे आमदार-खासदारांना भरघोस वेतन मिळत असताना मजूर, नोकरदारांची कमाई मात्र त्यातुलनेत फारकाही वाढताना दिसत नाही. केंद्राने खासदारांच्या वेतनात जवळपास 24 टक्के वाढ केली आहे. विशेष म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने हे वेतन मिळणार आहे. ता. 1 एप्रिल 2023 पासून 1.24 लाख रुपयांचे वेतन खासदारांच्या खात्यात जमा होणार आहे.

खासदार-आमदार मालामाल होत असताना सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. वाढलेल्या महागाईच्या तुलनेत हातात येणारा पैसा तोकडा पडत आहे. श्रीमंत अधिकच श्रीमंत होत चालले आहेत. तर गरीबांच्या झोळीत पडणारा पैसा किंचित वाढला आहे. ‘इंडिया एम्प्लॉयमेंट रेपोर्ट 2024’ हेच सांगतोय. मागील 10 वर्षांत नोकरदार किंवा छोट्या व्यावसायिकांच्या प्रत्यक्ष कमाईमध्ये घट झाली आहे. मजुरी वाढली असली तरी ते प्रमाण खूप कमी आहे, असे अहवाला म्हटले आहे.

खासदारांचे वेतन वाढवताना कॉस्ट इन्फ्लेशन इंडेक्सचा आधार घेण्यात आला आहे. त्यानुसार 2018 पासून खासदारांचे वेतन 50 हजारांवरून 1 लाख 24 हजारांवर पोहचले आहे. हे झाले फक्त वेतन. इतर भत्ते वेगळेच आहेत. आता सर्वसामान्यांचे पाहू. रोजगार अहवालानुसार 2012 ते 2022 पर्यंत सर्वसामान्य लोकांना मिळणाऱ्या वेतनात वाढ तर सोडाच पण घटच झाली. वेतन घेणाऱ्यांना 2012 मध्ये दरमहा सरासरी 12,100 रुपये मिळायचे. 2019 मध्ये हा आकडा 11,155 रुपये झाला. तर 2022 पर्यंत 10,925 रुपयांपर्यंत खाली आला. 

दुकानदार किंवा इतर छोटा व्यवसाय करणाऱ्यांची कमाई 2019 मध्ये दरमहा सरासरी 7,017 रुपये होती. ती घटून 2022 मध्ये 6,843 रुपये झाली. मजुरांची कमाई मात्र किंचित वाढल्याचे दिसते. 2012 मध्ये 3,701 हजार मिळणारे पैसे 2022 मध्ये 4,712 रुपयांपर्यंत पोहचले. दहा वर्षांत जवळपास हजार रुपये वाढले. कमाईमध्ये वाढ न होण्याचे प्रमुख कारण म्हणजे वाढलेली महगाई. पेट्रोल-डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. पण त्यातुलनेत बँकबॅलन्स वाढला नाही. उलट कमीच होत गेला. वाढता शैक्षणिक खर्चे, वाढलेले घरभाडे, घरांच्या किंमती, आरोग्यावरील खर्च... अशा एक ना अनेक गोष्टी सांगता येतील.   

स्थिर रोजगाराच्या संधींमध्येही अपेक्षित वाढ झालेली नाही. अस्थायी म्हणजे कंत्राटी नोकरदारांचे प्रमाण अधिक आहे. सरकारी नोकरभरती सुरू असली तरी बेरोजगार तरुणाईच्या वाढत्या संख्येत हे प्रमाण अल्प आहे, असेही अहवाल म्हटले आहे. देशात एकीकडे ही स्थिती असताना खासदारांचे वेतन मात्र महागाईचे कारण देत भरमसाठ वाढवले जात आहे. एकीकडे खासदार दरमहा 1.24 लाख रुपये (भत्ते वगळून) वेतन घेणार असून मजूर सरासरी 4,712 रुपयांवर (2022 मधील आकडेवारी) आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT