Cooperative Taxi Service : ओला, उबेरला टक्कर देण्यासाठी मोदी सरकारची 'सहकार टॅक्सी'; अमित शहांचा प्लॅन समजून घ्या...

Modi Government Cooperative Taxi Scheme Amit Shah Taxi Plan India : सरकार टॅक्सी सेवा ही ऑनलाईन टॅक्सी, दुचाकी, रिक्षा सेवा पुरविणाऱ्या सेवेप्रमाणेच काम करणार आहे.
amit shah
amit shahsarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत एक मोठी घोषणा केली आहे. संपूर्ण देशभरात या घोषणेचा मोठा परिणाम होणार आहे. देशात सध्या खासगी प्रवासी सेवा पुरवणाऱ्या ओला, उबेरसारख्या काही खासगी कंपन्या आहेत. या वाहतूक सेवेप्रमाणेच आता मोदी सरकारही अशीच सेवा सुरू करणार आहे. शहांनी काही महिन्यांतच ‘सहकार टॅक्सी’ सुरू केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

सरकार टॅक्सी सेवा ही ऑनलाईन टॅक्सी, दुचाकी, रिक्षा सेवा पुरविणाऱ्या सेवेप्रमाणेच काम करणार आहे. पण यातून संबंधित चालकांना मिळणारा संपूर्ण फायदा त्यांच्याच खिशात जाणार असल्याचेही शहांनी स्पष्ट केले आहे. धनदांडग्यांना हा पैसा मिळणार नाही, असे ते म्हणाले आहे. त्यामुळे ओला, उबेरसारख्या सेवांसमोर सहकार टॅक्सीचे आव्हान उभे राहणार आहेत.

amit shah
Pakistan Border : पाकिस्तानच्या सीमेवर तब्बल 5 हजार होमगार्ड्स करणार तैनात; देशात पहिल्यांदाच राज्य सरकारचा मोठा निर्णय

सहकार टॅक्सी सेवेमध्ये केवळ टॅक्सीच नव्हे तर दुचाकी आणि रिक्षांचीही नोंदणी होणार आहे. त्यामुळे प्रवासी सेवेमध्ये हा बदल ऐतिहासिक ठऱणार आहे. संपूर्ण देशात एकाच प्लॅटफॉर्मवर यापूर्वी अशाप्रकारची सेवा कधीही सुरू झालेली नाही. मागील काही वर्षांत काही खासगी कंपन्यांकडून अशी सेवा पुरवली जात आहे. आता थेट केंद्र सरकार त्यात उडी घेणार आहे.

काय असेल प्लॅन?

केंद्र सरकार आता या ऑनलाईन सेवांमध्ये असलेली काही ठराविक कंपन्यांची मक्तेदारी, त्यांच्याकडून होणारी ग्राहकांसह चालकांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी मोठे पाऊल टाकणार असल्याचे दिसते. महाराष्ट्रासह देशांतील अनेक महानगरे आणि शहरांमध्ये ऑनलाईन प्रवासी सेवांचा वापर केला जातो. त्याला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या क्षेत्रांत पाऊल ठेवत मोदी सरकार थेट प्रवाशांच्या जिव्हाळ्याच्या विषयात हात घालणार आहे.

amit shah
Yashwant Varma : नोटांचं घबाड सापडलेल्या न्यायाधीशांचं काय होणार? सुप्रीम कोर्टाचा एक रिपोर्ट ठरवणार भवितव्य!

ऑनलाईन प्रवासी सेवेसाठी केंद्र सरकारकडून स्वतंत्र पोर्टल आणि अपची निर्मिती केली जाऊ शकते. त्याचे कामही युध्दपातळीवर सुरू असावे. कारण अमित शाह यांनी पुढील काही महिन्यांत ही सेवा सुरू करण्याचे म्हटले आहे. ‘सहकार’ असे नाव देत त्यांनी सरकार आणि प्रवाशांमधील सहकार्याची भावना वृध्दिंगत करण्याचा प्रयत्न केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com