Nana Patole Sarkarnama
विश्लेषण

Nana Patole : एक था टायगर, एकट्या विदर्भात दहापैकी सात जागांवर पटोलेंच्या कॉंग्रेसला लीड

Uttam Kute

Pimpari News :लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळपासून सुरु झाली आहे. देशात एनडीए आघाडीवर असून त्याच्या नेमके उलट चित्र महाराष्ट्रात आहे.येथे आघाडी ही महायुतीवर भारी पडते आहे.४८ पैकी २७ ठिकाणी  दुपारी साडेबार वाजेपर्यंत आघाडीने लीड घेतले होते.त्यात कॉंग्रेसची कामगिरी लक्षणीय होताना दिसत आहे.त्यांना या निकालातून मोठा बूस्टर डोस मिळण्याची चिन्हे आहेत.

गेल्यावेळी २०१९ ला राज्यात कॉंग्रेसचा फक्त एकच खासदार होता. त्यांना फक्त एक जागा मिळाली होती.ती म्हणजे चंद्रपूरची.तेथून बाळू धानोरकर विजयी झाले होते.त्यांचे आकस्मिक निधन झाले.आता २०२४ला त्यांच्या पत्नी प्रतिभा या कॉंग्रेसच्या उमेदवार आहेत.त्यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजपचे आणि राज्याचे कॅबिनेटमंत्री सुधीर मुनंगटीवर यांच्यावर आघाडी घेतली आहे.तेथे पुन्हा कॉंग्रेस विजयी झाली,तर त्यांचा हा बालेकिल्ला शाबीत राहणार आहे.तर,त्याचवेळी भाजपला  हा मोठा धक्का असून मुनगंटीवारांसारख्या बड्या नेत्याचा तेथे पराभव होणार आहे.

एकूणच कॉंग्रेसला २०२४ च्या लोकसभेच्या निकालातून राज्यात पुन्हा ऊर्जितावस्था मिळेल,असे दिसते आहे.त्यात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आक्रमक चेहरा असलेल्या नाना पटोलेंचे मोठे योगदान राहणार आहे. ते विदर्भातील  आहेत. तेथेच दहापैकी सात ठिकाणी कॉंग्रेसने दुपारी बारा वाजेपर्यंत एक लाखाचे लीड घेतलेले आहे.त्यात चंद्रपूरच्या जोडीने अकोला ही आहे. अकोल्यात वंचित चे प्रकाश आंबेडकर ही उमेदवार आहेत.त्यांच्या बालेकिल्यातच त्यांना मोठा धक्का बसताना दिसतो आहे. कारण तेथे कॉंग्रेसचे अभय पाटील आघाडीवर आहेत.

कॉंग्रेसने १७ जागा लढवल्या होत्या. त्यातील ११ ठिकाणी ते दुपारी साडेबारा वाजता लीडवर होते.तसेच त्यांचे बंडखोर आणि सांगलीतील अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे राज्यातील एकमेव अपक्षही आघाडीवर आहेत.त्यांचा विजय झाला,तर तो कॉंग्रेसचाच असणार आहे.कारण त्या पक्षाचे राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे ते नातू आहेत.एकूणच पटोले यांच्या प्रदेश अध्यक्षतेखाली कॉंग्रेसने राज्यात पुन्हा उसळी घेतली आहे.जुन्या सुवर्णकाळाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरु झाली आहे.कारण निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊनही कॉंग्रेसची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे.

सध्या राज्यात विरोधी बाकावरील कॉंग्रेस व त्यांच्या आघाडीला पुन्हा राज्यात सत्तेत येण्यासाठी लोकसभा निवडणुकीतील यश उपयोगी पडणार आहे.त्यातही कॉंग्रेसच्या अपेक्षित घवघवीत यशामुळे पटोलेंची कॉलर दिल्लीत टाईट होणार आहे. तसेच विधानसभेला राज्यात आघाडीच्या जागावाटपात त्यांची बार्गेनिंग पॉवरही वाढणार आहे.देशात म्हणजे केंद्रात सत्तेत येण्यास उत्तरप्रदेशानंतर जसा महाराष्ट्राचा वाटा असतो.या दोन्ही ठिकाणी भाजपला धक्का यावेळी बसतो आहे यूपीत सपा,तर महाराष्ट्रात कॉंग्रेसची घौडदौड लक्षणीय यशाच्या दिशेने सुरु आहे. भविष्यात पुन्हा कॉंग्रेस देशात सत्तेत येण्याची ही पायाभरणी ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT