Maharashtra Lok Sabha Election 2024 Results : कसब्यानेच केला धंगेकरांचा घात, कसब्यातून मुरलीधर मोहोळांची आघाडी

Pune Election Result : कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी आघाडी घेतली असून धंगेकर आमदार असलेल्या मतदार संघात त्यांना आघाडी मिळत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
ravindra dhangekar
ravindra dhangekarsarkarnama
Published on
Updated on

Pune News : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये आमदार रवींद्र धंगेकराना 12000 मतांनी विजयी करणाऱ्या कसब्यानेच धनगेकरांचा घात केला असल्याचा समोर येत आहे. सर्व फेऱ्यांमध्ये कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी आघाडी घेतली असून धंगेकर आमदार असलेल्या मतदार संघात त्यांना आघाडी मिळत नसल्याचे  चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये अखेर आता भाजप महायुतीच्या उमेदवाराने मोठी आघाडी घेतली असल्याचं दिसून येत आहे. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना एक्झिट पोलमध्ये आघाडीवर दाखवण्यात आलं होतं. मात्र तरीदेखील आपणच विजय होणार हा विश्वास रवींद्र धंगेकर यांना होता. मात्र मतमोजणीच्या पहिला फेरी पासून मोहोळ यांनी आपली आघाडी कायम ठेवल्याचं दिसून आला आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदा चौरंगी लढत पाहायला मिळाली. महायुतीचे मुरलीधर मोहळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांच्यासह एमआयएमचा देखील उमेदवार रिंगणात होता. मात्र खरी लढाई ही महाविकासाकडे आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये झाली. सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीमध्ये शेवटी रवींद्र धंगेकर यांनी चुरस आणली होती. काँग्रेसने देखील या लोकसभा मतदारसंघांमध्ये आपली पूर्ण ताकद लावून नागपूर येथील दहा आमदारांना वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात ऍक्टिव्ह केलं होतं. मात्र याचा फारसा फायदा धंगेकर यांना झालेला पहिला मिळत नाही.  

लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीत भाजपच्या गिरीष बापट यांना जवळपास ३ लाख २० हजारांचे लीड होते. म्हणजे, या निवडणुकीत त्यांना सव्वासहा लाख मते मिळाली होती. पुण्यात २०१४ पासून भाजपची ताकद वाढली असून, या काळात पुण्यातील ८ आमदार भाजपचे राहिले. त्यानंतर महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत या पक्षाचे ९९ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे पुण्यात भाजपचे एकहाती वर्चस्व असल्याचे कागदावरील ताकदीने दिसून येते. परंतु, या निवडणुकीत काँग्रेसच्य धंगेकरांनी भाजपपुढे आव्हान उभे केले. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात एकतर्फी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात धंगेकरांनी काहीशी फिरवल्याचे चित्र दिसून आले. मात्र, आमदार, माजी आमदार, माजी नगरसेवकांच्या आकड्याला शोभेल इतके लीड मोहोळांना असणार का, याची चर्चा रंगली. त्यात, भाजपच्या एका माजी खासदाराने मोहोळांना पाडण्यासाठी धंगेकरांना छुपी रसद पुरविण्याचा मुद्दा पुढे  

मुरलीधर मोहोळांची आघाडी २७ हजार ५९८ वर…

चौथी फेरी

पुणे लोकसभा मतमोजणी

वडगाव शेरी - मोहोळ - ७३६७  - धंगेकर. - ५१५३

शिवाजीनगर -२४५१  - २२६५

कोथरुड - ५३६४- २७५६

पर्वती - ६६२७- ३९१७ 

कॅन्टोनेंंट - १६३१ - ३२८२

कसबा - ५३६४ - २७५६

एकूण. -  २८८०४ -  २०१२९

मोहोळ यांची एकूण आघाडी - ८६७५ (एकूण २७५९८)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com