विश्लेषण

"बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार? राष्ट्रवादीनं डिवचलं

पेट्रोल दरवाढीवरुन मोदी सरकारवर (Narendra Modi) नवाब मलिक (ncp nawab malik) यांनी निशाणा साधला.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारासाठी सॉफ्टवेअरचा वापर करत असल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप नुकताच केला आहे. ''फडणवीस सरकारच्या काळात डिजीटल दलाल होता. फडणवीस सरकारच्या काळात काय-काय घोटाळे झाले हे लवकरच बाहेर काढू,'' अशा इशारा राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्याक मंत्री, नवाब मलिक (ncp nawab malik) यांनी दिला आहे. नवाब मलिक पत्रकार परिषदेत बोलत होते. पेट्रोल दरवाढीवरुन त्यांनी मोदी सरकारवर (Narendra Modi) निशाणा साधला.

''देशात पेट्रोलचे दर वाढून ११० रुपये प्रति लिटर झाले आहे. डिझेलही शंभरी गाठत आहे. सीएनजी आणि एलपीजीचे भाव वाढत आहेत. जगात क्रूड ऑईलच्या तुलनेत देशातील इंधनाची दरवाढ नाही. युपीएचे सरकार असताना भाजपचे नेते सांगायचे की, आम्हाला सत्ता द्या आम्ही इंधनदर कमी करु. "बहुत हुई मंहगाई की मार, अब की बार मोदी सरकार". पेट्रोल दरवाढीचे भांडवल करुन मोदी सरकार सत्तेवर आले,'' असा आरोप मलिकांनी यावेळी केला.

''सत्तेवर आल्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्यावेळी जागतिक स्तरावर क्रूड ऑईलचे दर कोसळल्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले. त्यामुळे मोदी साहेब दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात म्हणत होते की, "मेरे नसीबसे दाम कम हो रहे है", असं बोलणारे मोदीजी आता कुणाच्या नशीबाने भाव वाढत आहेत. तुमच्या नशीबाने की जनतेच्या नशीबाने? कोण कमनशीबी आहे? देशातील जनता की तुम्ही? याचे उत्तर मोदींनी द्यावे,'' अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

''पेट्रोल डिझेलने शतक मारलं आहे. यूपीएच्या काळात ६० रुपये होते तेव्हा यावर प्रश्न उपस्थित करत होते. भाजपवाले त्यावेळी सत्ता आली की पेट्रोल डिझेलचे दर कमी करु, असं आश्वासन देत होते. संसद चालू देणार नाही ही भूमिका घेत होते. आता मोदींनी सांगावं की दर का वाढले? यूपीएच्या काळात भाजपवाल्यांनी तेव्हा थयथयाट केला, दिल्लीच्या निवडणुकीत मोदींनी सांगितलं की माझ्या नशिबांनी किंमत कमी झाली आता सांगा कुणाच्या नशिबानं किंमत वाढतेय?'' असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला.

माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला असता तर अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात दिसलं असतं, असं वक्तव्य माध्यमांशी बोलताना केलं. यावर नवाब मलिक यांनी त्यांना उत्तर दिले आहे. मलिक म्हणाले, ''पूर्ण मंत्रिमंडळ तुरूंगात टाका. जनता पाहतेय, बंगालमध्ये जनतेनं जे ऊत्तर दिलं तेच ऊत्तर तुम्हाला इथे मिळेल'' मलिक यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर विविध आरोप आजच्या पत्रकार परिषदेत केली. जम्मू काश्मीरमध्ये होणारे दहशतवादी हल्ले, पेट्रोल आणि डिझेलचे वाढते भाव, महागाई, शेतकरी आंदोलन या मुद्यावरुन नवाब मलिकांनी भाजप आणि संघावर निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT