Rajya Sabha Electiom Sarkarnama
विश्लेषण

Rajya Sabha Election : राज्यसभेची एकही निवडणूक न हरलेला नेता आघाडीचे आमदार फोडणार? 24 तासांत लागणार निकाल...

Parimal Nathwani, Jharkhand Politics : सध्याची राजकीय स्थिती पाहता झारखंड मुक्ती मोर्चामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराविषयी नाराजी आहे. कोणतीही चर्चा न करता काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्याने जेएमएमच्या नेत्यांनी उघडपणे कान उपटले होते.

Rajanand More

India Alliance news : राज्यसभेच्या सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळविणाऱ्या आणि आता चौथ्या निवडणुकीतही विजयासाठी झटणाऱ्या एका उमेदवाराची सध्या देशभरात चर्चा होत आहे. हा उमेदवार अपक्ष असला तरी भाजपच्या पाठिंब्यामुळे बळ मिळाले आहे. थेट रिलायन्स कंपनीशी संबंध असलेल्या हा उमेदवार इंडिया आघाडीची मते फोडून विजयी होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

परिमल नाथवानी असे या उमेदवाराचे नाव आहे. ते झारखंडमधून अपक्ष उमेदवार म्हणून झारखंड विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. राज्यात राज्यसभेच्या दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. नाथवानी यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत चुरस वाढली असून काँग्रेसचा उमेदवार संकटात आल्याची चर्चा आहे. गुरूवारी (ता. १७) मतदान होणार असून त्यानंतर काही तासांत मतमोजणीही होईल.

खरंतर नाथवानी हे उद्योजक आहेत. ते अधिकृतपणे कोणत्याही पक्षाचे सदस्य नाहीत. रिलायन्स कंपनीशी त्यांचे कनेक्शन आहे. २००८ पासून सलग तीनवेळा ते राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत. आता ते चौथ्यांदा आपले नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे एकदाही ते पराभूत झालेले नाहीत. त्यामुळे चौथ्या निवडणुकीतही अशक्यप्राय विजय मिळवत ते बाजी मारणार का, हे पाहावे लागेल.

राज्यसभेच्या दोन जागांवर सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाने बैजनाथ राम आणि काँग्रेसने प्रणव झा हे उमेदवार उतरविले आहेत. नाथवानी हे भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून उतरले असले तरी त्यांना विजयासाठी झगडावे लागणार आहे. निवडून येण्यासाठी २८ आमदारांची मते हवी आहेत. इंडिया आघाडीकडे ५६ आमदार असून दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. मात्र, नाथवानी यांना एनडीएच्या २४ आमदारांसह आणखी चार अतिरिक्त मतांची गरज आहे. आघाडीतील क्रॉस वोटिंगवरच त्यांचा विजय अवलंबून आहे.

नाथवानी यांनी राज्यसभेची पहिली निवडणूक झारखंडमधूनच अपक्ष लढविली होती. त्यावेळीही क्रॉस वोटिंगमुळे त्यांचा विजय झाला होता. सध्या इंडिया आघाडीत असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने त्यांना मतदान केले आहे. दुसऱ्या निवडणुकीत झारखंडमधूनच ते बिनविरोध निवडून आले होते. तर आंध्र प्रदेशातून वायएसआर काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्यांनी तिसरी निवडणूक जिंकली होती. आता ते तिसऱ्यांदा झारखंडमधून आपले नशीब आजमावत आहेत.

सध्याची राजकीय स्थिती पाहता झारखंड मुक्ती मोर्चामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराविषयी नाराजी आहे. कोणतीही चर्चा न करता काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्याने जेएमएमच्या नेत्यांनी उघडपणे कान उपटले होते. तसेच आसाममधील निवडणुकीतही काँग्रेससोबत आघाडी झाली नव्हती. बिहारच्या निवडणुकीतही जेएमएमला डावलण्यात आले होते. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षाकडून काँग्रेस उमेदवाराला झटका दिला जाऊ शकतो, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT