PM Modi's Strategic Visit to Bihar : पंतप्रधान मोदी आज(शुक्रवार) बिहार दौऱ्यावर आहेत. ते रोहतास जिल्ह्यातील विक्रमगंजमध्ये जनसभेस संबोधित करणार आहेत. खरंतर ऑपरेशन सिंदूर नंतरचा पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच बिहार दौरा आहे. असे मानले जात आहे की, या सभेद्वारे मोदी बिहार निवडणुकीसाठी एक मोठा संदेश देणार आहेत. मात्र प्रश्न असा आहे की, पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी विक्रमगंजचीच निवड का केली गेली आणि यामागचा संदेश नेमका काय आहे?
विक्रमगंज विधानसभा मतदारसंघ बिहराच्या मगध आणि शाहबाद क्षेत्राच्या एकदम मध्यात येतो. मगध शाहाबाद क्षेत्र भाजप आण एनडीएसाठी सातत्याने डोकेदुखी बनलेले आहे. मागील लोकसभा निवडणुकीबाबत बोलायचे झाले तर, बिहारमध्ये एनडीएला ज्या दहा जागांवर पराभव स्वीकारावा लागला, त्यापैकी सात लोकसभा जागा याच मगध, शाहबाद क्षेत्रात येतात.
शाहबाद आणि मगध क्षेत्रातील बक्सर, आरा, सासाराम, औरंगाबाद, जहानाबाद, पाटीलपुत्र आणि काराकाटमध्ये केंद्रीय मंत्री आरके सिंह, उपेंद्र कुशवाह आणि रामकृपाल यादव यांच्यासारखे एनडीए आणि भाजपचे अनेक दिग्गज उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या ठिकाणी हे जाणून घेणे, आवश्यक आहे की शाहबादमध्ये चार लोकसभा मतदारसंघ आहेत. आरा, सासाराम, कारकाट, बक्सर आणि मगध मध्ये पाच लोकसभा मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये पाटणा, औरंगाबाद, गया, जहानाबाद, नवादा यांचा समावेश होतो. केवळ लोकसभाच नाहीतर २०२०च्या विधानसभा निवडणुकीतही एनडीएने याच क्षेत्राता अतिशय खराब प्रदर्शन केले होते.
२०२०च्या विधानसभा निवडणुकीत एनडीए उमेदवार शाहाबाद आणि मगध क्षेत्रातील जहानाबाद, पाटीलपुत्र, बक्सर आणि काराकाट लोकसभा मतदारसंघातील एकही विधानसभेची जागा जिंकू शकले नव्हते. शाहबाद मगध क्षेत्रात विधानसभेच्या एकूण ५५ जागा आहेत. ज्यामध्ये भाजप आणि एनडीए केवळ दहा जागाच जिंकू शकलेली आहे.
मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महाआघाडीने अतिशय चागंली कामगिरी केली होती. आता एनडीए पंतप्रधानांच्या सभेद्वारे बिहार विधानसभा निवडणुकीआधी या क्षेत्राता वातावरण निर्मिती करण्याच्या प्रयत्नात आहे. ज्यामुळे आगामी निवडणुकीत ते आपली कामगिरी चांगल्याप्रकारे बजावू शकतील.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.