Pratap Sarnaik-CM Devendra Fadnavis News Sarkarnama
विश्लेषण

Pratap Sarnaik : प्रताप सरनाईकांचे 'डावपेच' भाजपच्या अंगलट? महायुतीची डोकेदुखी वाढणार!

Politcal News : महायुतीमधील भाजप, शिंदेची शिवसेना, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेकांवर आरोप केले जात आहेत.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. येत्या काही दिवसातच घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यातच महायुती स्वबळावर की एकत्रित निवडणूक लढणार यावरून वाद रंगला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असली तरी मित्रपक्षांत सर्व काही आलबेल दिसत नाही.

महायुतीमधील भाजप, शिंदेची शिवसेना, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेकांवर आरोप केले जात आहेत. त्यातच आता या आरोप-प्रत्यारोपातूनच भाजपकडून केल्या जात असलेल्या आरोपांची चौकशी करण्याची तयारी दर्शवत शिंदे सेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपची कोंडी केली आहे.

मीरा-भाईंदरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व भाजपचे (BJP) आमदार नरेंद्र मेहता असे महायुतीमधील दोन पक्षाचे नेते आहेत. सध्या मीरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने सध्या भाजप व शिंदे शिवसेनेत कार्यकर्ते एकमेकाकडे खेचण्याची स्पर्धा लागली आहे. त्यातूनच आता एकमेकांना कोंडीत पकडले जात असल्याने वातावरण ढवळून निघाले आहे.

मीरा-भाईंदरचे भाजप जिल्हा अध्यक्ष दिलीप जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यावरील आरोपाची चौकशी करण्याची मागणी केली होती. विशेषतः सरनाईक हे बिल्डर आहेत. त्यामुळे या पत्रामध्ये त्यांनी सरनाईक यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यासोबतच त्यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे सरनाईक यांच्या अडचणीत भर पडली होती.

भाजपकडून करण्यात आलेल्या या आरोपानंतर मंत्री सरनाईक यांनी तातडीने पावले उचलत या पत्राची चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार करणारे भाजपचे पदाधिकारी या त्यांच्या कृतीमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत.

दुसरीकडे प्रताप सरनाईक यांनी त्यांची चौकशी करण्यास होकार दर्शवला असला तर मीरा-भाईंदरचे भाजपचे स्थानीक आमदार नरेंद्र मेहता यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांची चौकशी करण्याची मागणी यापूर्वीच शिंदे यांच्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे. त्यामुळे एकंदरीतच सरनाईक यांनी त्यांच्यासोबतच भाजपच्या नेत्याची चौकशी करण्याची मागणी करत कोंडी केली आहे.

आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतील, असे गृहीत धरले जात असतानाच सध्या सत्ताधारी महायुतीमधील मित्र पक्ष एकमेकांवर आरोप करीत सुटले असल्याने निवडणुकीपूर्वीच वातावरण तापले आहे. अशा प्रकारच्या आरोपातूनच मित्र पक्ष एकमेकांना टार्गेट करीत असल्याने वातावरण ढवळून निघाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT