Manikrao Kokate News : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सातत्याने चर्चेत आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यांनी तंबी दिली होती. दरम्यान, त्यांनी दोनच दिवसांपूर्वी सिन्नर तालुक्यात काढून घेतलेल्या पिकांच्या ढेकाळाचे पंचनामे करायचे का? असा विधान केले होते. त्यांच्या या विधानावर टीका होत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये आता आणखी एक वादग्रस्त विधान करत त्यांनी वाद ओढवून घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान कार्यक्रमात बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले, 'कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी आहे. ती अजितदादांनी मला दिली आहे.' कृषीमंत्रीच असे वक्तव्या करत असल्याने आता यावरून कोकाटे यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
कोकाटे म्हणाले, 'शेतकऱ्याने उत्पादीत केलेला माल चांगला कसा उत्पादन करता येईल या दृष्टीकोनातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. हे सगळे प्रयत्न झाले तरी शेवटी विक्री केल्यानंतर पैसे मिळतात त्या पैशामध्ये त्यांचे भागते का याचा विचार शक्यतो होतो नाही. त्यामुळे शेती आपल्याला परवडत नाही, असा आपला समज झाला आहे. शेती काही लोकांना परवडते काही लोकांना परवडत नाही.'
'मला एक दोन आमदार भेटले ते म्हणाले दीडशे एकर द्राक्ष बाग एका दिवसात तोडून टाकली. त्यांना परवडत नाही पण आमच्याकडे द्राक्षबागेतून कोट्यावधी कमवणारे लोक आहेत.', असे देखील कोकाटे यांनी सांगितले.
कृषीमंत्री कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा वाद निर्माण झाला आहे. भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना एक रुपया पीकविमा देतो, असे वक्तव्य कोकाटे यांनी केले होते. तसेच कर्जमाफीचे पैसे शेतकरी शेतासाठी न वापता त्या पैशात साखपुडा आणि लग्न करतो, असे देखील कोकाटे यांनी एका शेतकऱ्याने कर्जमाफी विषयी विचारल्यानंतर म्हटले होते. तसेच नाशिकच्या दौऱ्यात त्यांनी कांद्याच्या भावावरून शेतकऱ्यांना दोषी ठरवते म्हटले होते की, चांगला भाव मिळाला की सगळेच शेतकरी कांद्याची लागवड करतो त्यामुळे उत्पादन वाढते आणि भाव पडतो. कोकाटेंनी यांनी वादग्रस्त वक्तवानंतर माफी मागून त्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा देखील प्रयत्न केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कोकाटेंच्या ढेकळांचे पंचनामे करायचे का? या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. कृषीमंत्री संवेदनशील नाहीत. त्यांच डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल सपकाळ यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कृषीमंत्र्यांना आवार घालावा अन्यथा काँग्रेस आणि शेतकरी त्यांना धडा शिकवेल, असा इशारा देखील सपकाळ यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.