मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी गटांची आरक्षण सोडत नुकतीच पार पडली. पुणे जिल्हा परिषदेचे गटांचे आरक्षण पावणेचार वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानतर जाहीर करण्यात आले. जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय असते. ग्रामीण भागातील अनेक झेडपी सदस्यांच्या राजकीय भवितव्याची वाटचाल ही जिल्हा परिषदेतून सुरुवात होते. त्यामुळे झेडपीचा सदस्य होणे, ही राजकारणातील एन्ट्रीची पहिली पायरी ठरते.
पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले चार जण आमदार कसे झाले हे जाणून घेऊयात पुणे जिल्हा परिषदेतील सन 2017 ते 2022 या कार्यकाळातील अनेक सदस्यांनी आपापल्या राजकीय जीवनात प्रगतीची शिखरे गाठली.
या कार्यकाळातील 75 पैकी चार सदस्य हे आमदार झाले आहेत. खेड तालुक्यातील बाबाजी काळे, बारामती तालुक्यातील रोहित पवार, हवेली तालुक्यातील ज्ञानेश्वर कटके आणि मुळशी तालुक्यातील शंकर मांडेकर यांचा समावेश आहे.
आपल्या राजकारणाची सुरुवात रोहित पवार यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली. 2017 मध्ये ते बारामती तालुक्यातील शिर्सुफळ -गुणवडी गणातून त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यांनतर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार केला.
रोहित पवार हे बारामती ऍग्रो या कंपनीचे ते सीईओ आहेत. तसंच इंडियन शुगरमिल असोसिएशनचे ते अध्यक्षसुद्धा आहेत रोहित पवार यांच्या कुटुंबाकडून विविध उपक्रम बारामती व अन्य शहरात राबवले जातात.
बाबाजी रामचंद्र काळे हे पुणे जिल्ह्यातील खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार आहेत. 2024 च्या निवडणुकीत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आले आले. मुळचे अभियंता असलेले काळे हे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरवात जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून केली. त्यांना प्रथम सांडभोर-कलूस गणातून त्यांनी निवडणूक लढवली, ते विजयी झाले. त्यांनी खेड आळंदी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप मोहिते पाटील यांचा पराभव करून निर्णायक विजय मिळवला.
शिरूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर 2024च्या निवडणुकीत ते विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक पवार यांचा पराभव केला. ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. ते हवेली तालुक्यातून जिल्हा परिषदेवर निवडून आले होते.
मुळशी तालुक्यातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले शंकर मांडेकर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भोर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २००१ ते २००५ या काळात ते चांदे गावाचे सरपंच होते. २००७ ते २०१६ अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.