Daund Politics Veerdhaval Jagdale Vs Rahul Kul  sarkarnama
विश्लेषण

Pune ZP Politics : पुणे झेडपी अध्यक्षपदाच्या निवडीने दौंडच्या राजकारणात मोठा बदल; आता जगदाळे विरुद्ध कुल लढत! थोरात गटाच्या राजकारणाला उतरती कळा

Daund Politics Veerdhaval Jagdale Vs Rahul Kul : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आी आहे. या निवडीने दौंडचे राजकारणार बदलणारे असल्याचे संकेत मिळाले आहेत,

Roshan More

Pune ZP News : दौंड तालुक्यातील खडकी देवळगाव गटाचे नेतृत्व करणारे वीरधवल जगदाळेंना पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक इच्छुक असताना जगदाळेंवर सुनेत्रा पवार यांनी विश्वास दाखवला. जगदाळे यांची निवड ही दौंडच्या राजकारणातील बदलाची दिशा मानली जात आहे.

भाजप आमदार राहुल कुल यांनी राष्ट्रवादीपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. माजी आमदार रमेश थोरात यांनी कुल यांच्या विरोधात दंड थोपले मात्र मागील तीनही निवडणुकीत त्यांना यश आले नाही. त्यामुळे कुल यांच्या विरोधात राष्ट्रवादी आश्वासक चेहऱ्याच्या शोधात होती. जगदाळे यांच्या रुपाने राष्ट्रवादीला तो चेहरा गवसला आहे हेच त्यांच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून दिसते.

वीरधवल यांना राजकारणाचे बाळकडून हे त्यांच्या घरातून मिळाले आहेत. त्यांचे वडील कृष्णराव जगदाळे हे दौंडचे माजी आमदार आहेत. 2018 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांचा राजकीय वारसा वीरधव हे पुढे चालवत आहेत. सलग तीन वेळा जिल्हा परिषदेमध्ये विजयी होत त्यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे.

अवघड निवडणूक...

यंदा खडकी देवळगाव गटात वीरधवल यांना निवडणूक जड जाईल, अशी चर्चा होती. मात्र, योग्य रणनीती आखत त्यांनी आपला विजय सोपा केला. भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस होती. त्यामुळे भाजपमधील दुखावलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी जवळ केले. निवडणुकीत त्यांचा योग्य वापर करत विजय खेचून आणला.

रमेश थोरांचे राजकारण बदलणार

दौंडच्या राजकारणात रमेश थोरात हे राहुल कुल यांचे परंपरागत विरोधक मानले जातात. त्यांचे पुत्र यंदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत होते. त्यांनी विजय देखील मिळवला. त्यामुळे मुलाच्या अध्यक्षपदासाठी थोरांतकडून प्रयत्न केले जात असल्याची चर्चा होती. मात्र, सुनेत्रा पवार यांनी अनुभवाला प्राधान्य देत जगदाळे यांची निवड केली. या निवडीने थोरात यांचे देखील राजकारण बदलण्याची शक्यता आहे. कारण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भविष्यातील आमदार समजला जातो. त्यामुळे दौंडच्या राजकारणात कुल विरुद्ध जगदाळे असा सामना होणार आहे.

दौंडचा धुरंधर

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात भाजपने आपले हातपाय पसरले आहेत. शहरी भागासोबत ग्रामीण भागात देखील राहुल कुल यांनी पक्षाचा चांगला प्रसार केला आहे. त्यामुळे भाजपच्या या आक्रमक रणनीतीला जगदाळे यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर दिल्याचे मानले जात आहे. दौंड तालुक्यात राष्ट्रवादीचा आमदार नाही. त्यामुळे जगदाळे यांच्या रुपाने दौंडला नेतृत्व देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी भविष्यात जगदाळे हे धुरंधर ठरण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT