

सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या आज होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला. आहे. आज सकाळी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच पक्षांकडून आपापले उमेदवार मैदानात उतरवत जोरदार ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अर्ज माघार घेण्याच्या प्रक्रियेनंतर आता अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत नाट्यमय वळण आले आहे.
अध्यक्षपदासाठी सुरुवातीला भाजपकडून दावेदारी करण्यात आली होती, तर शिवसेनेकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे अध्यक्षपदाची लढत चुरशीची होणार असे चित्र होते. पण एका तासाच्या आत अचानक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. शिवसेनेच्या शीतल बाबर यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमा मोरे यांनीही माघार घेतली आहे.
उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही असेच चित्र पाहायला मिळाले. भाजपचे जयराज पाटील आणि काँग्रेसच्या विद्या कुंभार यांनीही आपले अर्ज मागे घेतल्यामुळे लढतीचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. या सर्व घडामोडींमुळे आता दोन्ही पदांसाठी थेट आणि स्पष्ट लढत निर्माण झाली आहे.
अध्यक्षपदासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संगीता पाटील आणि भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांच्यात सरळ सामना होणार आहे. या दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे ऋषिकेश लाड आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हिम्मत जाधव यांच्यात मुकाबला रंगणार आहे.
अर्ज माघार प्रक्रियेनंतर स्पष्ट झालेल्या या लढतींमुळे सांगली जिल्हा परिषदेत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय हालचालींमुळे वातावरण तापले असून अंतिम निकाल काय लागतो, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.