Rahuri Bypoll Political Twist Sarkarnama
विश्लेषण

Rahuri Bypoll Political Twist : मुख्यमंत्री आले, आभार मानले अन् निघून गेले; पण तनपुरेंचा ‘भगवा टायमिंग’ गेम कितपत यशस्वी? राजकारणात नवा ट्विस्ट!

At the Rahuri assembly by-election campaign closing rally, CM Devendra Fadnavis publicly thanked former minister Prajakt Tanpure, sparking political buzz : राहुरी पोटनिवडणुकीच्या सांगता सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे जाहीर आभार मानले आहेत.

Pradeep Pendhare

Devendra Fadnavis Rahuri Bypoll : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची कालची सभा अन् तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांबरोबर निर्णायक बैठका, या टायमिंगमुळे तनपुरेंच्या भाजप पक्ष प्रवेशांच्या चर्चांना उधाण आलं होतं. तनपुरेंनीच या चर्चांची हवा मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी काढून घेतली.

मुख्यमंत्र्यांनी सभेत तनपुरेंच्या निर्णयाचं कौतुक करत आभार मानले. तनपुरेंनी मात्र टायमिंग साधलं, पण ते कितपत जुळलं हे आगामी काळात मतदारसंघातील प्रलंबित कामे मुख्यमंत्र्यांकडून मार्गी लावल्यावरच दिसेल, असे राजकीय विश्लेषकांचे निरीक्षण आहे.

भाजप उमेदवार यांच्या प्रचार सांगता सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थित झाली. त्याचवेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कार्यकर्त्यांबरोबर निर्णायक बैठकींचा धडाका लावला. यातून तनपुरेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चांना तनपुरे निवडणुकीपूर्वी मतदारसंघात हिंदुत्वाच्या मुद्यावर स्वार झाल्यांचा संदर्भ देण्यात आला.

आपला हिंदुत्ववादी आमदार येतोय, असे कॅम्पिंग करण्यात आलं. तनपुरेंच्या (Prajakt Tanpure) यांच्या या कॅम्पिंगला यश देखील मिळालं. ते पाहून तनपुरेंनी पेहरावात बदल केला. गळ्यात भगवा पंचा अन् डोक्यावर भगवी टोपी चढवली. तनपुरेंच्या या पेहरावला देखील जोरदार प्रतिसाद मिळाला. तनपुरेंना वाढता प्रतिसाद पाहून, भाजप देखील धास्तवाला.

तनपुरेंची भगवी वाटचाल पाहून, निवडणुकीचे भावनिक वातावरण पाहून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष देखील सावध झाला. चर्चा करण्यापेक्षा तनपुरेंच्या हालचालींवर, शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लक्ष ठेवणं पसंद केलं. 'वेट अ‍ॅण्ड वाॅच', अशा भूमिकेत राहिले.

अर्ज भरण्याची तयारीत असतानाच, तनपुरेंना मुख्यमंत्र्यांचा फोन झाला अन् शिष्टाई यशस्वी झाली. तनपुरेंनी अर्ज भरणार नाहीत, याची शरद पवार राष्ट्रवादीला अगोदरच चाहूल होती. त्यांनी दोन दिवस अगोदर गोविंद मोकाटे यांना हेरून ठेवलं होतं. गोविंद मोकाटे हे कर्डिले यांचे राजकीय कट्टर प्रतिस्पर्धी, त्यांना शरद पवार राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस अन् तनपुरे यांचे ट्यूनिंग जुळण्याबरोबर, टायमिंग देखील साधण्यावर दोन्ही बाजूने भर देण्यात आला. विशेष करून यात तनपुरे आघाडीवर राहिले. उमेदवारी न करण्याच्या निर्णयानंतर, लगेचच तनपुरेंनी महाविकास आघाडी सोडलेली नाही, मी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, 2029साठी मविआकडून रणसंग्रामाची तयारी सुरू आहे, अशी विधानं केली.

भाजपची तनपुरेंकडून पाठिंबा मिळण्यासाठी धडपड

तनपुरेंच्या या विधानांने भाजप आणखीच अस्वस्थ झाला. तनपुरे यांचे नेमकं काय चाललं आहे, यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरू झाली. राहुरीतून मताधिक्य मिळाल्याशिवाय भाजपला ही निवडणूक सोपी नाही, याचे गणित हेरून, पुन्हा तनपुरेंशी जुळवून घेण्याची तयारी सुरू झाली. यातच भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तनपुरेंना पुन्हा भेटणार असल्याचं विधान केलं.

तनपुरेंसाठी भाजपचे

रवींद्र चव्हाण यांची राहुरी आणि जेऊर (ता. नगर) इथं सभा झाल्या. या सभांमध्ये चव्हाण, भाजप विधान परिषदेचे सभपाती प्रा. राम शिंदे आणि उमेदवार अक्षय कर्डिले यांनी तनपुरेंनी निर्णय घ्यावा, त्यांचे भाजपमध्ये स्वागतच होईल, अशी विधानं केली. यानंतर तनपुरे यांच्याभोवती पुन्हा चर्चा सुरू झाल्या.

तनपुरेंनी भाजपची हवाच काढून घेतली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित सांगता सभा घेण्याचा निर्धार भाजपने केला. त्याचवेळी तनपुरेंनी कार्यकर्त्यांबरोबर निर्णयाक बैठकींचे आयोजन केले. त्यामुळे तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाला अधिकच बळ मिळाले. मुख्यमंत्री फडणवीस यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले असेल, तोपर्यंत तनपुरेंच्या बैठकांचा जोर वाढला असतानाच, दुपारच्या मध्यवर्ती तनपुरे यांनी आपण राष्ट्रवादीशी एकनिष्ठ आहोत, भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, अशी भूमिका मांडली. पण बैठकीत कार्यकर्त्यांबरोबर काय चर्चा झाली याची गोपनीयता तनपुरे अन् त्यांच्या कार्यकर्ते बाळगून आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून तनपुरेंचं कौतुक

तनपुरेंच्या या भूमिकेनंतर भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. प्रा. राम शिंदे यांनी मुख्यमंत्री येत आहेत, ते सुदर्शन चक्र फिरवतील, असे विधान करून, पुन्हा तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना हवा दिली. मुख्यमंत्री फडणवीस सभा स्थळी आले. जोरदार भाषण करताना उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या हातात विकासाचा 'बियरर चेक' देऊन जात आहे, असे सांगताना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेचे स्वागत, कौतुक अन् आभार मानले.

फडणवीसांबरोबर वाटाघाटी

मुख्यमंत्री फडणवीस यांनी तनपुरे यांच्याबरोबर झालेल्या फोनचा दाखला देखील दिला. परंतु भाजप प्रवेशाच्या चर्चेवर कोणतंही भाष्य केलं नाही. तनपुरेंनी सुरवातीपासून भाजप प्रवेशाच्या चर्चांवर भाष्य न करता, राजकीय टायमिंग साधत राहिले. राहुरी पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारापेक्षा तनपुरेच चर्चेच्या सर्वाधिक केंद्रस्थानी राहिले. तनपुरेंनी साधलेल्या या राजकीय टायमिंगची चर्चा आगामी काळात सुरूच राहील. परंतु ते भाजपबरोबर किती जुळलं, हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी झालेल्या वाटाघाटी अन् प्रत्यक्ष मतदारसंघात आगामी होणाऱ्या कामांवरूनच दिसेल!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT