Prime Minister Narendra Modi, Raj Thackeray And CM Devendra Fadnavis Sarkarnama
विश्लेषण

Raj Thackeray Politics: मोदींनंतर राज ठाकरेंचा फडणवीसांना पाठिंबा; विधानसभेला फसलेला प्लॅन मनसे 'स्थानिक'साठी जुळवणार..?

MNS And BJP News : गुढीपाडवा मेळाव्यात सगळे पक्ष महापालिका निवडणुकांची तयारी करत असताना राज ठाकरेंनी हे मोठं विधान करताना भाजपच्या इतर सर्व मुद्द्यांना विरोध करताना अचानकपणे राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मात्र पाठिंबा जाहीर केला. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

Deepak Kulkarni

MNS News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यांनी महायुतीच्या काही नेत्यांसाठी काही सभाही घेतल्या होत्या. विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार तयारी करतानाच जवळपास 150 च्यावर उमेदवार दिले होते. मात्र, महायुतीच्या त्सुनामीसमोर मनसेचं इंजिन प्लॅटफॉर्मवरुन हललंच नाही. त्यांच्या पदरी भोपळाच आला.

त्यानंतर राज ठाकरेंनी महायुतीच्या यशावरच शंका उपस्थित करत नंतर मोदी सरकारचा अस्मितेचा मुद्दा ठरलेल्या कुंभमेळा, गंगेंचं पाणी यावर तिखट शब्दांत टीका केली होती. पण त्याच राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांच्या मनसेच्या इंजिनाची नेमकी दिशा अजूनही गोंधळलेलीच असून नुसता हॉर्न वाजवत जागेवरच उभं असल्याची राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतरही मनसेच्या राज ठाकरेंची क्रेझही आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच शिवाजी पार्कवरील मनसेच्या गुढीपाडव्याच्या दिवशी मेळाव्याला प्रचंड गर्दी जमा झाली होती. राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील राजकारणात तापलेल्या आपल्या भाषणात ईव्हीएम,कुंभमेळा आणि औरंगजेब कबर यांसारख्या अनेक मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलेल्या राज ठाकरेंनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महापालिकेवर चकार शब्दही काढला नाही.

राज ठाकरे यांच्या मनसे आता 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. पहिल्याच निवडणुकीत तब्बल 13 आमदार निवडून आलेल्या मनसेनं मुंबई, पुणे, नाशिक महापालिका निवडणुकीतही जोरदार मुसंडी मारली होती. पण त्यानंतरच्या जवळपास 2014, 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या सभांना प्रचंड गर्दी जमली पण त्या गर्दीचं मतात रुपांतर करता आलं नाही. याचमुळे मनसेला (MNS) जणू उतरती कळाच लागली. 2014 आणि 2019 ला राज ठाकरेंचा एकच आमदार निवडून आला. आणि 2024 ला मनसेच्या पदरात भोपळाच पडला.

याच राज ठाकरे आणि मनसेसाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या अस्तित्वाची लढाई असणार आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड मोठ्या यशानंतर स्थानिकसाठी जोरदार तयारी सुरु केलेल्या महायुतीतील भाजप,अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस,एकनाथ शिंदेंची शिवसेना या तीनही पक्षांचं राज ठाकरेंच्या मनसेसमोर कडवं आव्हान असणार आहे.

याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची मनसेची भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी ते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवतानाच भाजपबाबत थोडा कुठंतरी सॉफ्ट कॉर्नर घेताना दिसून येत आहे. तसेच सध्या जरी महायुतीत असलेल्या भाजपकडून पडद्यामागं कुठंतरी 'स्थानिक'साठी स्वबळाची चाचपणी केली जातेय.

यावेळी मुंबई,ठाणे,कल्याण-डोंबिवली,वसई-विरार, पुणे-पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांच्या महापालिका निवडणुकीत मनसे भाजपसाठी लकी फॅक्टर ठरू शकते. त्याचमुळे राज ठाकरे असो वा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकमेकांवर अगदी टार्गेट केलं जात नसल्याचं पाहायला मिळत आहे.

गुढीपाडवा मेळाव्यात सगळे पक्ष महापालिका निवडणुकांची तयारी करत असताना राज ठाकरेंनी हे मोठं विधान करताना भाजपच्या इतर सर्व मुद्द्यांना विरोध करताना अचानकपणे राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) मात्र पाठिंबा जाहीर केला. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

यामुळे राज ठाकरे म्हणाले की,निवडणुका संपल्या,शिमगा संपला.देवेंद्र फडणवीसांच्या हाती एक सुसंस्कृत राज्य आलेलं आहे. मराठी माणसासाठी जर चांगल्या गोष्टी करणार असाल तर आमचा तुम्हाला निश्चितपणे पाठिंबा आहे. पण प्रत्येक गोष्ट आमचं ऐकून करा असा सल्लाही त्यांनी यावेळी फडणवीसांना द्यायला राज ठाकरे हे विसरले नाहीत.

राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा विधानसभेसाठी फसलेला प्लॅन स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी तरी प्रत्यक्षात उतरणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपचे नेतेमंडळी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका करताना दुसरीकडे मनसे आणि राज ठाकरेंबाबत सौम्य भूमिका घेताना दिसून येते. तसेच मुख्यमंत्री फडणवीसांच्या 'शिवतीर्था'वरील फेऱ्याही वाढल्याचे लपून राहिलेले नाहीत.

महायुतीतील शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांचा विरोध पत्करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फटकळ राज ठाकरेंशी सलगी साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.आणि दुसरीकडे 'अभी नहीं तो कभी नहीं' म्हणत मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याही मनात भाजपसोबत राहिलो तरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी यश टप्प्यांत दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मनसेच्या इंजिनाला भाजप यशाचा राजमार्ग दाखवणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT