
Mumbai News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे य़ांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. दमानिया यांनी आज राजेंद्र घनवट यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. शेतकऱ्यांचा छळ करून त्यांच्या जमिनी लाटल्याचा दावा दमानियांनी केला आहे.
राजेंद्र घनवट आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याचा दावाही दमानिया यांनी केला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत दोघांचा एकत्रित फोटोही दाखवला. यावेळी त्यांच्यासोबत फसवणूक झालेले शेतकरीही होते. त्यामध्ये काही महिला शेतकऱ्यांनी मीडियासमोर आपबीती सांगितली. याबाबत कृषीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही तक्रार करणार असल्याचे दमानिया म्हणाल्या.
दमानिया यांनी सांगितले की, बीड प्रकरण लावून धरले, अनेक विषय लावून धरले, त्यावेळी राजेंद्र घनवट यांचे नाव मी एका चॅनेलच्या डिबेटमध्ये घेतले. ते घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला. आमच्या सगळ्यांचा छळ या राजेंद्र घनवट यांनी केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्याचा दावा दमानिया यांनी केला.
वेंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसमध्ये राजश्री मुंडे आणि राजेंद्र पोपटलाल घनवट हे दोघेच संचालक असल्याचे कागदही त्यांनी दाखवले. जगमित्र शुगर कंपनीतही राजश्री मुंडे आणि घनवटही आहेत, अशी माहिती दमानिया यांनी दिली. माझ्याकडे आता 11 शेतकऱ्यांची माहिती असून घनवट यांनी त्यांना छळून जमिनी लाटल्याचा आरोप दमानियांनी केला.
एकाची 20 कोटींची जमीन 8 लाखात बळकावली. मीरा सोनवणे यांच्या घरातील एक व्यक्ती 1997 मध्ये वारले होते. ते जिवंत दाखवून 2006 मध्ये जमिनीचा व्यवहार करण्यात आल्याचा दावा दमानिया यांनी केला. जे-जे शेतकरी त्यांच्याविरोधात लढले, त्यांच्याविरोधात घनवट यांनी गुन्हे दाखल केले, असा आरोप दमानिया यांनी केला.
माझ्याकडे त्यांचे असंख्य व्हिडीओ आहेत. आम्ही सगळ्या राजकारण्यांशी चांगले संबंध आहेत, म्हणून अशा जमिनी घेऊ शकल्याचे पोपटलाल घनवट व्हिडीओमध्ये सागंत असल्याचे दमानिया यांनी सांगितले. तुम्हाला हवे तेवढे मानहानीचे, हवे त्या केस करा. तुमच्या प्रत्येक केसची माहिती माझ्याकडे आहे, असे आव्हान दमानिया यांनी पोपटलाल घनवट यांना दिले. संजय उर्फ आनंद चव्हाण नावाचा एक व्यक्ती आहे. त्याच्या नावावर सगळ्या पॉवर ऑफ अटर्नी घेतल्या जातात. त्याचा कसा गैरवापर होतो, याचाही माहिती आपल्याकडे असल्याचा दावा दमानियांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.