नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वादावर अखेर तोडगा निघाला आहे. काँग्रेस (Congress) हाय कमांडच्या भेटीसाठी पायलट काल दिल्लीत दाखल झाले होते. यानंतर 24 तासांतच गेहलोत हे दिल्लीत दाखल झाले असून, त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. यामुळे राजस्थानमधील राजकीय वातावरण तापले आहे.
राजस्थानमधील मंत्रिमंडळाचा विस्तार आणि सरकारी महामंडळांवरील नियुक्त्या याबाबत सोनिया गांधींनी गेहलोत यांना आदेश दिले आहेत. हे फेरबदल तातडीने व्हावेत, असेही सांगण्यात आले आहे. पायलट यांनी वर्षभरापूर्वी पुकारलेल्या बंडानंतर त्यांना काही आश्वासने देण्याती आली होती. ही आश्वासने मिळाल्यानंतर पायलट यांनी बंडाची तलवार म्यान केली होती. आता पक्षाने ही आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत.
पायलट यांनी काल (ता.10) दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. यानंतर वेगाने चक्रे फिरण्यास सुरवात झाली आहे. पक्षश्रेष्ठींनी गेहलोत यांना मंत्रिमंडळ विस्तारासाठी कानपिचक्या दिल्या आहेत. पायलट समर्थकांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असून, सरकारी महामंडळांमध्येही काही समर्थकांना स्थान दिले जाणार आहे. यानंतर 24 तासांतच गेहलोत हे दिल्लीत दाखल झाले असून, त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. याबाबत बोलताना गेहलोत म्हणाले की, राजस्थानमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय पक्षाचे नेतृत्व घेईल. पक्षाचे प्रभारी अजय माकन यांना याबाबत संपूर्ण माहिती आहे. राज्यात सुशासन राहावे, हीच आमची इच्छा आहे.
पायलट यांनी मंत्रिमंडळात समर्थक आमदारांना जास्त प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी लावून धरली आहे. परंतु, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा याला विरोध आहे. राजस्थानध्ये मंत्रिमंडळात 30 पर्यंत मंत्री असू शकतात. सध्या मुख्यमंत्री गेहलोत यांच्यासह 21 मंत्री आहेत. सरकारमध्ये सध्या 9 मंत्रिपदे रिक्त आहेत. पायलट यांनी ही सर्व मंत्रिपदे समर्थकांसाठी मागितली आहेत. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याला नकार दिला होता. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रस्तावावर दोन्ही नेत्यांची सहमती झाल्याचे समजते.
राज्यातील काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून गेहलोत आणि पाललट गटामध्ये संघर्ष वाढला होता. सचिन पायलट यांनी केलेल्या मागण्यांवर वर्षभरानंतरही पक्षाने निर्णय न घेतल्याने ते नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रभारी अज माकन यांनी गेहलोत यांच्यासह पायलट गटाचीही बैठक घेतली होती. पायलट समर्थकांना पक्ष संघटनेत आणि सरकारमध्ये स्थान देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.