✅ 3-Point Summary:
आरएसएस शताब्दी वर्ष – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्षे आहे, यानिमित्ताने व्याख्यानमालेचे आयोजन केले जात आहे.
विशेष निमंत्रण मोहीम – विविध राजकीय, धार्मिक आणि सामाजिक नेत्यांना व्याख्यानमालेसाठी आमंत्रित केले जात आहे; राहुल-सोनिया गांधी यांना निमंत्रण न देण्याचा निर्णय.
देशव्यापी आयोजन आणि चर्चा – दिल्लीसह बेंगलुरु, कोलकाता, मुंबई येथे व्याख्यानमाला होणार असून संघाच्या वाटचालीचा आढावा आणि पुढील दिशा यावर विचारमंथन होणार आहे.
Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) हे शताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने संघाची विचारधारा पोहचविण्यासाठी आरएसएसचे स्वयंसेवक कामाला लागले आहेत. सर्वसामान्यांसह राजकीय नेत्यांपर्यंत विशेषत:संघाला नेहमीत कोंडीत पकडणाऱ्या पक्ष, नेत्यांना संघाची विचारधारा समावून सांगण्यासाठी त्यांना निमंत्रण देण्यात येत आहे.
आरएसएसची येत्या 26 ऑगस्टपासून तीन दिवस व्याखानमाला आहे. सरसंघचालक (Sarsanghchalak Mohan Bhagwat)मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहे, असे संघाचे प्रचार प्रभारी सुनील आंबेकर यांनी सांगितले. विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण देणार असल्याचे आंबेकर यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते, अर्थतज्ज्ञ, संघाच्या विचारधारेतील व्यक्ती आणि संघटना यांनी निमंत्रण पाठविण्यात येत आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना संघाच्या व्याखानमालेचे निमंत्रण देणार का? याबाबत संघाच्या एका पदाधिकाऱ्यांन स्पष्टीकरण दिले आहे. जे व्यक्ती आमच्याशी, आमच्या कामाबाबत संपर्कात असतात, अशाच व्यक्तींना निमंत्रण पाठविणार आहोत. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना निमंत्रण पाठवून उपयोग नाही, कारण ते निमंत्रण स्वीकारणार नाहीत, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. याबाबतचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
संघाच्या व्याख्यानमालेचे अल्पसंख्याक समाजातील प्रमुख व्यक्ती, राजकीय नेते, धार्मिक नेते यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. यासाठी संघाने 17 प्रकार आणि 138 उपप्रकार केले आहे. संघाने 2018 मध्ये व्याख्यानमालेसाठी अशाच प्रकारचे नियोजन केले होते. मोहन भागवत यांनी संघाचे विचारधारा सांगितली होती.
ही व्याखानमाला दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. यंदा संघाचे शताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने देशाच्या विविध ठिकाणी अशा व्याख्यानमाला घेण्याचे नियोजन संघाचे आहे. बेंगलुरु, कोलकाता आणि मुंबई येथे ही व्याख्यानमाला आयोजित करण्याचा आरएसएसचा मानस आहे.
संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा आढावा व्याख्यानमालेत घेण्यात येणार आहे. पुढील वाटचालीबाबत दिशा ठरविण्यात येणार आहे. पाच परिवर्तन आणि त्यामध्ये विविध समाजाचा सहभाग यावर चर्चा होणार आहे. विकासाच्या मार्गावर भारताची घोडदौड, स्वंयसेवकाचे योगदान, त्यांच्या इच्छा, आकांशा यावर व्याख्यानमालेत लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. 2018 मध्ये मोहन भागवत यांनी 'भारताचे भविष्य' या विषयावर आपले विचार मांडले होते.
✅ 4 FAQs (One-line Answers):
आरएसएसचे शताब्दी वर्ष कधी साजरे होणार आहे?
→ संघाचे शताब्दी वर्ष सुरु आहे.
व्याख्यानमालेत कोण सहभागी होणार आहेत?
→ राजकीय, सामाजिक, धार्मिक नेते आणि विचारवंत सहभागी होणार आहेत.
राहुल गांधी आणि सोनिया गांधींना निमंत्रण देण्यात आले का?
→ नाही, कारण त्यांनी निमंत्रण स्वीकारण्याची शक्यता नसल्याचे संघाने स्पष्ट केले आहे.
व्याख्यानमालेचे मुख्य मुद्दे काय असणार?
→ संघाची 100 वर्षांची वाटचाल, भारताचा विकास आणि सामाजिक परिवर्तन यावर चर्चा होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.