Satara Lok Sabha Election Sarkarnama
विश्लेषण

Udayanraje Bhosale News: उदयनराजेंनी घेतला समन्वयकांकडून अंदाज, विजयाची गणिते कशी जुळणार?

Satara Lok Sabha Election 2024 Analysis:सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे ही लढत चुरशीची व प्रतिष्ठेची आहेच पण, दोघांपैकी एकाला राजकारणातून बाहेर फेकणारी ठरणार आहे.

Umesh Bambare-Patil

Satara News, 24 May: सातारा लोकसभा मतदारसंघाचे (Satara Lok Sabha Election 2024) महायुतीचे भाजपचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये त्यांच्या लोकसभा निवडणूक समन्वयकांकडून निकालाचा अंदाज जाणून घेतला. यामध्ये प्रमुख समन्वयकांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून कसे मताधिक्य मिळेल, याची माहिती उदयनराजेंना (Udayanraje Bhosale) दिली. त्यांच्या विजयाचे गणित कसे जुळते हेही समजून सांगितले आहे. त्यामुळे समन्वयकांनी सांगितलेल्या विजयाचे गणित जुळणार का हे चार जूनला समजणार आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खासदार उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Udayanraje Bhosale Vs Shashikant Shinde) अशी लढत झाली. ही लढत चुरशीची व प्रतिष्ठेची तर आहेच पण, दोघांपैकी कोणा एकाला राजकारणातून बाहेर फेकणारी ठरणार आहे.

सध्यातरी जिल्ह्यात दोन्ही बाजूंकडून विजयाचा दावा केला जात आहे. मतदानानंतर खासदार उदयनराजेंनी अल्पशी विश्रांती घेतल्यानंतर ते बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्या प्रचारात व सांगता सभेत सहभागी झाले होते. त्यानंतर थोडी विश्रांती घेतल्यानंतर त्यांनी सातारा लोकसभेसाठी नेमलेल्या त्यांच्या निष्ठावंत समन्वयकांची बैठक साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये घेतली. यामध्ये सर्व समन्वयकांकडून सहा विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य कसे मिळेल, याची आकडेवारीसह माहिती जाणून घेतली.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी उदयनराजेंच्या समन्वयकांनी विधानसभा मतदारसंघनिहाय मताधिक्याची आकडेवारी महाराजांना पटवून सांगितली. सातारा, वाई व कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून कसे मताधिक्य मिळेल. कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटणमधून मताधिक्य कसे वाढणार आहे, याची माहितीही दिली आहे. त्यामुळे महाराज साधारण ८० हजार ते सव्वा लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

समन्वयकांनी व्यक्त केलेला हा अंदाज कितपत जुळणार हे चार जूनलाच समजणार आहे. पण, सध्यातरी उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांना महाराजच निवडून येणार अशीच आशा आहे. त्यांच्या आशेला विजयाचे अंकुर फुटणार का, हे निकालादिवशी स्पष्ट होईल.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT