Nana Patole Sarkarnama
विश्लेषण

Video Nana Patole : विनाकारण राजकारणच्या टीकेला पटोलेंचे खणखणीत प्रत्युत्तर; नेमकं कोण टार्गेट?

Rajesh Charpe

Nagpur News : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणारा मूर्तिकार अनुभवहीन होता. तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असताना त्याला काम देण्याचे कारण काय असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला. या सर्व प्रकरणात मूर्तीकारासोबतच राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. आमच्या आंदोलनाला राजकारण म्हणता तर तुम्हाला कमिशनखोर म्हणायचे का अशी विचारणा त्यांनी भाजपच्या नेत्यांना केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा आठ महिन्यातच कोसळला. पुतळा उभारण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने घाई केली. आता सांस्कृतिक मंत्रालयाने याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. पुतळ्याच्या डोक्यात कापूस आणि कागद टाकल्याचे निदर्शनास आले आहे. बदलापूर असो किंवा शिवाजी महाराजांचा पुतळ्याची घटना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) सगळ्यांना राजकारण म्हणतात. आता या कमिशन खोरीला कुठले राजकारण म्हणायचे अशी विचारणा करून नाना पटोले यांनी छत्रपतींचा पुतळा कोसळणे हे राजकारण नाही तर हा आस्थेचा प्रश्न असल्याचे सांगितले

भाजपला (BJP) सत्तेचा माज आला आहे. भाजपचे नेते पोलिसांनाही जुमानत नाही. उघडपणे धमक्या देत आहेत. पोलीसांबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य केले जात आहे. आमदार राणे यांनी घातलेला राड्यावरून हे स्पष्टपणे दिसून येते. विरोधकांना आंदोलन करू दिले जात नाही. त्यांना धमक्या दिल्या जातात. नेत्यांच्या मुलाबाळांनाही शिव्या घातल्या जात आहे. हे सरकारने गुंड, माफियांना वाय सेक्युरिटी दिली आहे. महायुती सरकारने महाराष्ट्र असुरक्षित केला असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला.

काँग्रेसला निवडणुकीसाठी सर्वे करण्याची गरज नाही. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही मतदार आमच्या बाजूने आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) दोनशेच्यावर जागा निवडून येणार आहे. काँग्रेसने कुठलाही सर्वे केला नाही आणि अहवालसुद्धा सादर केला नसल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. भाजपलाच पराभवाची भीती वाटत आहे. म्हणूनच निवडणूक लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते आपल्या सोयीने विधानसभेची निवडणूक जाहीर करतील अशी शंकाही नाना पटोले यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT