Sharad Pawar : कोल्हापुरात शरद पवार तीन दिवसांत कुणाचा खेळ बिघडवणार? धक्के बसणार हे निश्चित...

Assembly Election 2024 Kagal Chandgad Constituency : राष्ट्रवादीकडून कोल्हापुरातील तीन विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे.
Sharad Pawar in Kolhapur
Sharad Pawar in KolhapurSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला धक्क्यावर धक्के देत महाविकास आघाडीने ही निवडणूक बरीचशी पुढे नेली आहे. पटलावर डाव येण्याआधी प्याद्यांची यशस्वी चाल करत महाविकास आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जिल्ह्यातील अनेक मतदारसंघ निशाण्यावर ठेवले आहेत.

येत्या 3 सप्टेंबर रोजी शरद पवार यांचा तीन दिवस कोल्हापूर दौरा आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने  जिल्ह्यातील राजकीय सूत्र हलवण्यात शरद पवार हे पुढच्या स्थानी असतील, असेच एकंदरीत चित्र आहे. 2 सप्टेंबरपासून हा दौरा सुरू होत असून, 4 सप्टेंबरला कोल्हापुरात त्यांचा मुक्काम आहे.

Sharad Pawar in Kolhapur
Gokul Dudh Sangh : गोकुळच्या वार्षिकसभेपूर्वी सत्ताधारी विरोधकांमध्ये 'व्हॉट्स अ‍ॅप वॉर'!

सांगलीत काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत. या तीन दिवसांच्या दौऱ्यात शरद पवार कोणत्या मतदारसंघात जोडण्या लावणार? त्याचा फटका कोणाला बसणार? याचे चर्चा आता मतदारसंघात रंगू लागली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी किती जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाणार? हा जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. विद्यमान जागा ज्या पक्षाकडे आहेत त्याच जागा कागल, चंदगड पुन्हा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. शिवाय राधानगरी मतदारसंघावर ही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विशेष लक्ष आहे.

Sharad Pawar in Kolhapur
Mahavikas Aghadi : कडेगावमध्ये गाजणार 'मविआ'च्या प्रचाराचा ट्रेलर, वाचा कोण कोण राहणार उपस्थित?

जिल्ह्यातील या तीन जागांवर जास्त आग्रह होत असल्याची माहिती आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर  कागलचे आमदार आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ, चंदगडचे आमदार राजेश पाटील, आणि राधानगरीचे माजी आमदार के पी पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्यास धन्यता मानली. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आपले राजकीय डावपेच आखत कागल विधानसभा मतदारसंघात पहिला धक्का दिला आहे.

भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष फोडून समरजीत घाटगे यांना मुश्रीफ यांच्या विरोधात उतरवणार असल्याची चर्चा आहे. या तीन दिवसांच्या दौऱ्यात मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील प्रवेश तर निश्‍चित आहे. शिवाय अन्य काही नेतेही पक्षात प्रवेश करण्‍याची शक्यता आहे.

चंदगड आणि राधानगरीतील महत्त्वाच्या नेत्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 2 सप्टेंबरला ते कोल्हापुरात येऊन बेळगावला जाणार आहेत. तेथील कार्यक्रमानंतर ते पुन्हा कोल्हापुरात येणार आहेत. 3 सप्टेंबरला सकाळी कोल्हापुरात अन्य एक कार्यक्रम आहे. सायंकाळी कागल येथे गैबी चौकात समरजितसिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश होणार आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. 3 सप्टेंबरला त्यांचा मुक्काम असून, 4 सप्टेंबरला दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये त्यांच्या हस्ते प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार होणार आहे.

Sharad Pawar in Kolhapur
Kolhapur Politics: मुश्रीफांनी कुणाशी जपली मैत्री? कुणाबाबत टाळलं बोलणं?

या तीन दिवसांच्या दौऱ्यात जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळण्याचा अंदाज आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघात राजेश पाटील यांच्या विरोधात कोण मातब्बर असणार? याची चर्चा आणि प्लॅनिंग होणार आहे. शिवाय राधानगरी विधानसभा मतदारसंघात ही तीच परिस्थिती आहे. सध्या ही जागा  शिवसेना ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी आमदार के पी पाटील यांना या मैदानातून संधी मिळणार की ए वाय पाटील यांना संधी मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com