Jaishankar's First Call With Taliban Minister Amir Khan Muttaqi sarkarnama
विश्लेषण

S.Jaishankar: पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! ऑपरेशन सिंदूरनंतर एस.जयशंकर यांचा नवा डाव; 'दिल्ली टू काबुल'

Jaishankar's First Call With Taliban Minister Amir Khan Muttaqi Sends Clear Message: भारत आणि अफगानिस्तानमध्ये अविश्वासाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता. पाकिस्तानचा हा खोटारडेपणा अफगानिस्तानने उघडा केला आहे. यासाठी जयशंकर यांनी अफगानिस्तानचे आभार मानले आहे.

Mangesh Mahale

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरने सडेतोड उत्तर दिले. भारतीय मिसाईल हल्ल्याच्या जखमा अजूनही ओल्या आहेत. सर्वबाजूने पाकिस्तानला घेरण्याचा प्रयत्न भारत करीत आहे. सिंधू जल करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानची चौफेर कोंडी करण्यासाठी भारताने पावलं उचलण्यास सुरवात केली आहे. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आता नवा डाव टाकला आहे.

अफगनिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी यांच्यासोबत त्यांनी फोनवर चर्चा केली. त्यामुळे पाकिस्तानचे टेन्शनं वाढल आहे. जयशंकर आणि तालिबान सरकारच्या परराष्ट्रमंत्र्यांची बातचीत ही पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. ज्यावेळी भारत-पाकिस्तानात तणाव होता. तेव्हा अफगानिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातही विस्तव पेटला होता. अशातच आता भारत आणि अफगानिस्तान यांचे जवळ येणे, दोस्ती होणं, हे पाकिस्तानच्या अडचणी वाढवण्यासारखं आहे. 'शत्रूचा शत्रू हा मित्र असतो, हे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.

अफगानिस्तानाने मोकळेपणाने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला आहे. दोन्ही देशातील बातचीत ही सकारात्मक झाल्याचे एस.जयशंकर यांनी सांगितले आहे. खोट्या बातम्या पसरवून भारत आणि अफगानिस्तानमध्ये अविश्वासाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केल्याचे जयशंकर यांनी सोशल मीडिया एक्स (x) वर सांगितले होते. पाकिस्तानचा हा खोटारडेपणा अफगानिस्तानने उघडा केला आहे. यासाठी जयशंकर यांनी अफगानिस्तानचे आभार मानले आहे.

एस. जयशंकर यांच्या विधानानं पाकिस्तान बेचैन

अफगानिस्तानच्या मंत्र्यांशी जयशंकर यांची काय बाततीत केली, की ज्यामुळे पाकिस्तानच्या सरकारच्या अडचणी कशा वाढणार, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जयशंकर यांनी पहिल्यांदा तालिबानी परराष्ट्रमंत्र्यांशी संवाद साधला आहे. हे दोन्ही देशातील राजनैतिक संबध अधिक मजबूत करण्याचे पहिलं पाऊल आहे.

अफगानिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात आधीच विस्तव असल्याने अफगानिस्तानशी मैत्री करुन पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी जयशंकर यांची ही रणनीती आहे.अफगानिस्तान-पाकिस्तान सीमेवर नेहमीच गोळीबारच्या घटना होत असतात. कधी कधी हवाई हल्ले होताना दिसतात. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान वरुन दोन्ही देशामध्ये वाद सुरु आहे. अशा परिस्थितीत भारत-आणि अफगानिस्तानच्या मैत्रीचं नवं पर्व सुरु होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT