Uddhav Thackeray and Devndra Fadnavis News Sarkarnama
विश्लेषण

Uddhav Thackeray News: ठाकरे-फडणवीस शंभर पाऊलच एकत्र चालले; पण इशारा कुणाला, शिंदेंना की आघाडीला?

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis Meet: मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक भूकंप झाले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics : मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक भूकंप झाले आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग आणि त्यानंतर झालेला सत्तासंघर्ष यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. मात्र, आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घडलेल्या एका घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. अधिवेशनामध्ये उपस्थित राहण्यासाठी उद्धव ठाकरे हे विधिमंडळाच्या गेटजवळ आले. ते गेटजवळ काही काळ थांबले, त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devndra Fadnavis) आले. विधिमंडळाच्या गेट जवळून दोघेही पाऱ्यांपर्यंत चालत आले. यावेळी दोघेही खळखळून हसले.

देवेंद्र फडणवीस नियमीत विधीमंडळात येताना त्यांच्या भोवती भाजपच्या आमदारांचा गराडा असतो. मात्र, आज ते एकटेच होते, त्यांच्या सोबत होते, उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे आमदार, दोन्ही नेत्यांमध्ये हास्यविनोदही रंगले, त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. या प्रसंगानंतर राजकीय वर्तुळात याची एकच चर्चा रंगली आहे.

राज्याच्या राजकारणात घडलेल्या घटनांमुळे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध ताणले गेले होते. एकमेकांवर जाहीर टिकाही होत होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केले होते. मात्र, त्यांनी फोन घेतले नव्हते, याचीही चर्चा झाली. मात्र, आज दोघांनी एकत्र एन्ट्री घेतली. यानंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.

फडणवीस आणि ठाकरे एकत्र दिसल्यामुळे नेमका हा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आहे की महाविकास आघाडीसाठी आहे, यावरुनही तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात आणखी काही घडामोडी घडतात का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT