BJP strategy Mumbai politics Sarkarnama
विश्लेषण

BJP strategy Mumbai politics : ठाकरे बंधूंमधील एकी कितपत टिकेल? आघाडीचं काय होणार? भाजप कोणता डाव टाकणार?

Uddhav-Raj Thackeray Unity to Impact BJP Strategy in Mumbai MVA Political Future Uncertain : मराठी भाषेमुळे एकत्र आलेल्या ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे संकेत दोन्ही बाजूचे नेते देत आहे.

Pradeep Pendhare

BJP vs MVA Mumbai : ठाकरे बंधूंचा एकत्रित मराठी आवाज विजयी मेळावा झाला. मराठीच्या मुद्यावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. याच मेळाव्यात एकत्र आलो, एकत्रच राहणार, असे उद्धव ठाकरे यांनी युतीचे स्पष्ट संकेत दिले.

मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंची झालेली एकी महापालिका निवडणुकीपर्यंत आणि त्यानंतर देखील टिकेल का? या प्रश्नावर राजकीय विश्लेषक अंदाज व्यक्त करू लागले आहे. पण ठोस असं भाकीत कोणालाच वर्तवता येत नाही.

मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा (MNS) मराठी आवाज विजयी मेळाव्याचा उत्साह झाला. उद्धव ठाकरे यांनी ‘आम्ही आलोय ते एकत्र राहण्यासाठी, दोघे मिळून आम्ही तुम्हाला फेकून देऊ’ असे सांगत दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. तर दुसरीकडे, राज ठाकरे यांनी मात्र युती, आघाड्या होत राहतील; मात्र मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र राहू, असे सांगितले. उद्धव ठाकरेंची देहबोली सकारात्मक होती, तर राज ठाकरे यांची देहबोली वेगळी होती, त्यावर चर्चा होत आहे.

मराठी भाषेमुळे एकत्र आलेल्या ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे संकेत दोन्ही बाजूचे नेते देत आहे. हा मेळावा यशस्वी करताना, दोन्ही बाजूचे नेते मंडळी नियोजनात होते. त्यामुळे अनेक राजकीय भानगडी एकमेकांमध्ये शेअर केल्या गेल्या. विशेष करून भाजप (BJP) महायुती सत्ताधाऱ्यांकडून दोन्ही पक्षाची नेत्यांची, कार्यकर्त्यांची कशी कोंडी केली जात आहे, यावर चर्चा केली गेली.

मुंबईसह कोकण, ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, तर राज्यातील प्रमुख शहरांमधील राजकीय परिस्थितीवर चर्चा करत होती. सत्ताधाऱ्यांकडून होत असलेल्या खच्चीकरणारवर आणि राजकीय कोंडीवर एकच सॉल्यूशन, ठाकरे बंधूंचे एकत्र राहणे, असा चर्चेचा सूर होता. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने काही राजकीय प्रश्न उपस्थित झाले आहे.

आघाडीबाबत प्रश्नचिन्हं?

ठाकरे कुटुंब एकत्र आल्याने महाविकास आघाडीत फूट पडेल, असा सूर आळवला जात आहे. मनसे आणि काँग्रेस यांच्या विचारधारेत मोठं अंतर आहे. शिवसेना आणि काँग्रेस पक्ष यांची विचारधारा भिन्न असली, तरी भाजपच्या अफवा उभा करणाऱ्या हिंदुत्वाविरोधात एकत्र आले, अन् राजकारणात काहीही होऊ शकते, असा संकेत दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आले.

काँग्रेसचा प्रभाव

या मेळाव्यात काँग्रेस नेते सहभागी नव्हते. पण काँग्रेसचा प्रभाव मुंबईतील काही पॉकेट्समध्ये आहे. तो नाकारता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबईतील राजकीय अस्तित्व जेमतेम आहे. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड हे दोन नेते सभेत सहभागी झाले होते.

मराठी मताची विभागणी टळेल?

ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईसह राज्यात दोन्ही पक्षांतून होत असलेली गळती आता थांबेल, असा अंदाज राजकीय विश्लेषक डॉ. सुमित म्हसकर यांनी वर्तवला. ठाकरे बंधूंच्या एकीचा सर्वाधिक फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसेल, असा अंदाज आहे. कारण विधानसभेत ज्या पद्धतीने हिंदुत्ववादी मतदान मनसेऐवजी भाजपला गेले, त्याप्रमाणे मराठी मतामध्ये आता विभागणी न होता एकगठ्ठा ते ठाकरे बंधूंकडे जाण्याची दाट शक्यता आहे.

राज ठाकरेंना इशारा अन् भूमिका...

ठाकरे बंधूंच्या एकीत फूट पाडण्यासाठी भाजप पुन्हा आटोकाट प्रयत्न करेल. भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेतील नेत्यांकडून जोरदार डिवचलं जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काय पत्ते फेकले जातील. दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे, असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाच आहे, तसंच मराठी माणसांचा रेटा बघता राज ठाकरे यांना ऐनवेळी भूमिका बदलणे सोपे नसेल, असा देखील राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT