Sanjay Raut on Uddhav and Raj Thackeray reunite And INDIA Alliance sarkarnama
विश्लेषण

Raj-Uddhav Thackeray Alliance: राज सोबत आहे...; राजकीय युतीवर उद्धव ठाकरेंकडून अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब

Uddhav Thackeray Hints at Alliance with Raj Thackeray: संजय राऊतांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव यांनी राज ठाकरे यांच्यासोबत राजकीय युती झाल्यावर शिक्कामोर्तब केले. पण राज ठाकरे यांच्याकडून अद्याप युतीबाबत कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही.

Mangesh Mahale

✅ ३ महत्वाचे मुद्दे

  1. उद्धव ठाकरे यांच्याकडून अप्रत्यक्षपणे युतीची घोषणासामना च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे सोबत असल्याचे सांगून आगामी युतीची शक्यता व्यक्त केली.

  2. मनसेकडून युतीबाबत अजून मौन: राज ठाकरे किंवा मनसेने युतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही; आतापर्यंत केवळ अंतर्गत बैठकांद्वारे भूमिका ठरवली जात आहे.

  3. स्थानिक निवडणुकांपूर्वी चित्र स्पष्ट होणार: युतीबाबतचा अंतिम निर्णय जागावाटपाच्या चर्चेनंतर स्थानिक निवडणुकांपूर्वी होण्याची शक्यता आहे.

खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत युती झाल्याचे सांगितले आहे. ठाकरे बंधू काही दिवसापूर्वी मराठीचा आवाज कार्यक्रमात एकत्र आले होते, पण त्यांच्यात राजकीय युती अद्याप झालेली नाही, अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी राज सोबत आहे, असे सांगून युतीची अप्रत्यक्षपणे घोषणा केली आहे.

ठाकरे घराण्यासाठी संघर्ष नवा नाही, ठाकरे घराण्यानं कायम संघर्ष केल्याचं उद्धव ठाकरें यांनी मुलाखतीत सांगितले. आता या संघर्षात आदित्य, राजही सोबत असल्याचं ते म्हणाले. याचा अर्थ राज यांच्यासोबत राजकीय युतीची झाली असल्याचे उद्धव यांनी सांगितले. राऊत यांनी सामना वृत्तपत्रासाठी ही मुलाखत घेतली आहे.

राऊतांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत राजकीय युती झाल्यावर शिक्कामोर्तब केले. पण मनसे किंवा राज ठाकरे यांच्याकडून अद्याप युतीबाबत कुठलीही घोषणा करण्यात आलेली नाही. मनसेच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. यात पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यात येत आहे.

युतीबाबत मनसेकडून मौन पाळण्याच आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जशा जवळ येतील, त्यावेळी या चर्चेला गती येईल. दोन्ही पक्ष जागा वाटपाबाबत चर्चा केल्यानंतर युती करायची की नाही हे स्पष्ट होईल, त्यामुळे अद्याप तरी मनसेच्या गोट्यातून युतीबाबत चर्चा नाही.

मनसे सध्या संघटना बांधणीकडे लक्ष देत आहे. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून राज सोबत असल्याचे जरी सांगितले असले तरी युतीबाबत राज ठाकरे जोपर्यंत स्पष्टपणे सांगत नाही तोपर्यंत युती होणार की नाही, हा प्रश्न अनुत्तरीतच राहील.

प्र1: उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी युतीबाबत काय सांगितले?
त्यांनी राज ठाकरे सोबत असल्याचे सांगून अप्रत्यक्ष युतीचा संकेत दिला.

प्र2: मनसेकडून युतीवर काय भूमिका आहे?
मनसेकडून अद्याप कोणतीही अधिकृत युतीची घोषणा झालेली नाही.

प्र3: युतीचा निर्णय कधी होईल?
स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ आल्यावर निर्णय अपेक्षित आहे.

प्र4: सध्या मनसे पक्ष कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत आहे?
मनसे सध्या संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT