Donald Trump, Narendra Modi Sarkarnama
विश्लेषण

US Iran war : ट्रम्प यांनी जगावर टाकला 'हप्ता' बॉम्ब; भारतही हादरला, साऱ्या मेहनतीवर पाणी फिरणार?

Hormuz Strait, Iran missile attack, India news : डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टोल टॅक्समुळे भारताचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. देशांतर्गत इंधनाची गरज भागविण्यासाठी तब्बल ९० टक्के कच्चे तेल आयात करावे लागते.

Rajanand More

US Hormuz Toll Tax : अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा युध्दाचा भडका उडला आहे. इराणकडून होर्मूझ सामुद्रधुनी बंद केली आहे. जगभरातील अनेक देशांच्या इंधनाची वाहतूक सुरू असलेला हा 'होर्मूझ' मार्ग युध्दास कारणीभूत ठरला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही सामुद्रधुनी आपल्या ताब्यात घेणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांच्याकडून आता या मार्गातून जाणाऱ्या जहाजांकडून हप्ता म्हणजे टोल टॅक्स घेतला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

जगातील विविध देशांना होर्मूझमधून तब्बल २० टक्के इंधनाची वाहतूक केली जाते. त्यामध्ये भारताचा वाटाही मोठा आहे. ट्रम्ब यांच्या घोषणेनुसार प्रत्येक जहाजाला २० टक्के टोल द्यावा लागेल. ट्रम्प यांनी या मार्गाचे संरक्षण आपण करणार असल्याचे सांगत त्यासाठी टोल द्यावा लागेल, असे स्पष्ट केले आहे. या निर्णयाचा भारतालाही मोठा फटका बसणार आहे.

युध्द सुरू झाल्यानंतर इंधन संकटावर मात करण्यासाठी भारताकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. आखाती देशांसोबत अन्य देशांमधूनही इंधनाची गरज भागविण्यासाठी कच्च्या तेलाची आयात केली जात आहे. गॅसचे उत्पादन वाढविले जात आहे. परिणामी अन्य देशांच्या तुलनेत भारतातील इंधनाचे दर तुलनेने कमी असल्याचे सरकारकडून सांगितले जाते. मात्र, या प्रयत्नांना खीळ बसण्याची भीती आहे.

ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टोल टॅक्समुळे भारताचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. देशांतर्गत इंधनाची गरज भागविण्यासाठी तब्बल ९० टक्के कच्चे तेल आयात करावे लागते. त्यापैकी सर्वाधिक आयात आखादी देशांतून होर्मूझ मार्गे होते. कच्चे तेलाची ४० टक्के, एलएनजी ६० टक्के आणि एलपीजीची तब्बल ९० टक्के आयात होर्मूझमार्गे होते.

प्रामुख्याने इराक, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, कुवैत, कतार या देशांमधून भारतात कच्चे तेल येते. यापैकी काही देशांवरही इराणही क्षेपणास्त्र डागली आहेत. त्यामुळे तेथील स्थिती आधीच बिघडू लागली आहे. अजूनही होर्मूझमधून अपेक्षित वाहतूक सुरू झालेली नाही. त्यामुळे भारतावर काही प्रमाणात दबाव आहे. ही वाहतूक नियमितपणे सुरू झाली तरी २० टक्के टोल द्यावा लागल्यास भारताला आर्थिक फटका बसू शकतो.

टोल टॅक्समुळे देशांतर्गत इंधनाचे दर वाढवू शकतात, अशी भीती आहे. त्यामुळे फक्त इंधन संकटच नव्हे तर महागाईचे संकटही देशावर घोंघावू शकते. त्याचा परिमाण देशाच्या विकासदरावरही होऊ शकते. जून महिन्यातील किरकोळ महागाईचा दर चार टक्क्यांच्या पुढे गेला आहे. मागील १७ महिन्यांतील हा दर सर्वाधिक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT