Narendra Modi and Utpal Parrikar Sarkarnama
विश्लेषण

गोव्यात भाजपची मोदी लाट तर उत्पल पर्रीकरांची मूक लाट!

उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी पणजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्याचे (Goa) दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी पणजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपने (bjp) त्यांना तिकीट नाकारले होते. पणजीच्या मैदानात भाजपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) उतरवले आहे. भाजपचा भरवसा मोदी लाटेवर असताना उत्पल पर्रीकरांनी आपली मूक लाट असल्याचा दावा केला आहे.

पणजीत पक्षीय भिंती विसरून अनेक नेते उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत. यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. गोव्यात भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. मोदींच्या करिष्म्यावर आता भाजप अवलंबून आहे, अशी टीका होत आहे. याचवेळी उत्पल यांनी आपली मूक लाट असल्याचा दावा केला आहे. पणजी सोडून दुसऱ्या मतदारसंघातून लढण्याचा प्रश्नच नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

उत्पल पर्रीकर म्हणाले की, पणजीत माझ्या बाजूने मतदारांची मूक लाट आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर 2019 मध्ये तिकीट नाकारण्यात आले. स्थानिक राजकारणामुळे त्यावेळी मला डावलले होते. त्यावेळी मी पक्षाचा निर्णय मान्य केला होता. नंतर काँग्रेसमधून आणलेल्या व्यक्तीला पणजीतून उभे करण्यात आले. त्याच्याविरुद्ध असे गुन्हे दाखल आहेत की त्याबद्दल बोलतानाही मला लाज वाटते. भाजपने मला पणजी सोडून इतर तीन मतदारसंघातून तिकीट देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, माझी लढाई ही कधीही पर्यायाची नव्हती.

उत्पल पर्रीकर अपक्ष उभे राहिल्यास पाठिंबा देऊ, असे शिवसेनेने यांनी जाहीर केले होते. शिवसेनेकडून हा शब्द पाळण्यात आला आहे. शिवसेनेचे पणजीतील उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर अर्ज मागे घेतला. त्यामुळे पर्रीकर यांची ताकद निश्चितच वाढणार असल्याचे बोलले जात आहे. पर्रीकर हे भाजप सोडण्याआधीपासूनच ते अपक्ष उभे राहिल्यास पाठिंबा देऊ, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतली होती.

दरम्यान, उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने गोव्यातील राजकारणाला (Goa Politics) वेगळं वळण मिळालं आहे. त्यामुळे भाजपची पणजी मतदारसंघात डोकेदुखी वाढली आहे. उत्पल पर्रीकर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी भाजपसमोर त्यांनी एकमेव अट ठेवली होती. ती अट म्हणजे, भाजपने पणजीतून चांगला उमेदवार द्यावा. भाजपने चांगले उमेदवार दिल्यास ते माघार घेतील, असे त्यांनी जाहीरपणे म्हटले होते. भाजप सोडण्याचा निर्णय अतिशय अवघड होता, असेही त्यांनी म्हटले होते. परंतु, भाजपने पणजीतून बाबूश मोन्सेरात यांची उमेदवारी कायम ठेवल्याने पर्रीकर यांनी लढण्याचा निर्णय कायम ठेवला. (Utpal Parrikar News Updates)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT