आम्हाला आदिती तटकरे नकोतच! शिवसेनेचे आमदार आक्रमक झाल्याने वाद पेटला

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
Aditi Tatkare with Sunil Tatkare
Aditi Tatkare with Sunil TatkareSarkarnama
Published on
Updated on

रायगड : काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. याला रायगडच्या (Raigad) पालकमंत्री व राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे (Aditi Tatkare) कारणीभूत ठरल्या आहेत. जिल्ह्याचा पालकमंत्री बदला, असा पवित्रा शिवसेनेच्या (Shivsena) जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी घेतला आहे. याचबरोबर काँग्रेस आणि भाजपनेही अशीच मागणी लावून धरली आहे.

आदिती तटकरे यांना पालकमंत्री पदावरून हटवले जावे, यावरून जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील संघर्ष समोर आला आहे. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे आदिती तटकरेंना हटवण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असतानाही जिल्ह्यात एकमेव राष्ट्रवादीच्या एकमेव आमदार असलेल्या अदिती तटकरे यांना पालकमंत्री पद देण्यात आले. यामुळे नाराजी उफाळून आली आहे.

Aditi Tatkare with Sunil Tatkare
'स्किन टू स्किन'चा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांचा निवृत्तीच्या एक दिवस आधीच राजीनामा

जिल्ह्यात पालकमंत्री अदिती तटकरे या मनमानी कारभार करीत आहेत. घटक पक्षांना विश्वासात घेत नाहीत, असा आरोप आमदार गोगावले यांनी केला आहे. त्यामुळे तटकरे यांना पालकमंत्री पदावरून हटवून शिवसेनेचा पालकमंत्री करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत शिवसेनेचे जिल्ह्यातील तिन्ही आमदार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे आपल्या सोबत आहेत, असा दावा आमदार गोगावले यांनी केला आहे.

Aditi Tatkare with Sunil Tatkare
नितेश राणे दिसताच फडणवीस म्हणाले, ऑल दी बेस्ट!

माणगाव नगरपंचायत निवडणुकीनंतर वाद पेटला

राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि भाजपने एकत्र येत विकास आघाडीच्या माध्यमातून माणगाव नगरपंचायतीची निवडणूक लढवली होती. या आघाडीने सत्ता मिळवली असून, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपद मिळवले आहे. यानंतर गोगावले यांनी आता राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्या विरोधात हल्लाबोल केला आहे. रायगडते खासदार सुनील तटकरे हे आघाडीचा धर्म पाळत नसल्याची टीका त्यांनी केली आहे. माणगावमध्ये शिवसेनेने भाजपसोबत आघाडी केल्यानंतर तटकरे यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वावर टीका केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com