Uddhav Thackeray, Prakash Ambedkar, Aditya Thackeray, Tejashwi Yadav Sarkarnama
विश्लेषण

भाजपने शिवसेनेला मुंबईत आस्मान दाखवण्याचे ठरवले; ठाकरेंनी आव्हान स्विकारले अन् चावीच फिरवली

Prakash Ambedkar, Uddhav Thackeray News : राज्यात पुन्हा एकदा आता शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग होणार आहे.

अमोल जायभाये

Prakash Ambedkar, Uddhav Thackeray News : राज्यात पुन्हा एकदा आता शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची युती करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने प्रस्थाव दिला आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकाद नवीन प्रयोग होणार आहे. त्यामुळे भाजपच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही चावीच फिरवली, असल्याचे म्हणता येईल.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळीच या युतीचे संकेत मिळाले होते. या नवीन समिकरणामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा नवा ट्वीस्ट आला आहे. या युतीचा पहिला प्रयोग मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यातच मुंबई महापालिका जिंकायचीच असा निर्धार भाजपने केला आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला 84 आणि भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. तेव्हा भाजपला आपला महापौर करता आला असता. मात्र, शिवसेना आणि भाजपची युती असल्यामुळे ते शक्य झाले नाही. तरी तेव्हा जे झाले नाही ते आता भाजपला साध्य करायचे आहे. ठाकरेंना पूर्नपणे घेरायचे असेल तर मुंबई ताब्यत यायला हवी, असे भाजपला वाटते. त्यामुळे ते जोरदार पणे मैदानात उतरले आहेत.

भाजपने आमदार आशिष शेलार यांची मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून निवड त्यासाठीच केली आहे. 2017 च्या निवडणुकीत शेलार यांच्या नियोजनामुळे भाजप पहिल्यांदाच 82 जागांवर पोहचला होता. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत स्वता: लक्ष घातले आहे. अनेक वर्ष मुंबईचे अध्यक्ष असलेल्या मंगलप्रभात लोढा यांना मंत्रीपद दिले आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढत आहे. भाजपच्या या रणनीतीला लगाम घालण्यासाठी ठाकरेही कामाला लागले. वंचितची आघाडी त्याचाच एक भाग आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी बिहार गाठत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली.

यादव यांच्या भेटीमागे मुंबई महापालिकेचेच गणित असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. मराठी मतांसोबतच, वंचित आणि उत्तर भारतीय मतांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्यापुढे भाजप-बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) त्याच बरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही आव्हान असणार आहे. मनसे वेगळी लढणार असल्याने मराठी मतांमध्ये फुट पडून ५०० ते १००० मतांच्या फरकाने शिवसेनेच्या उमेदवारांना फटका बसू शकतो. त्यामुळे ही मते भरून काढण्यासाठी वंचितचा चांगला उपयोग शिवसेनेला होईल. अनेक वॉर्डांमध्ये वंचितचे निर्णायक मतदान आहे.

२०१७ च्या मुंबई (Mumbai) महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची निर्मिती झालेली नव्हती. आंबेडकरांच्या भारीपने महानगरपालिका निवडणूक लढवली होती. मात्र, त्यामध्ये त्यांना फारसे यश मिळाले नाही. परंतु त्यांनी घेतलेली मते ४ ते ५ टक्यांच्या जवळपास आहेत. वंचितच्या प्रयोगानंतर आंबेडकर यांनी अनेक समाज एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्या मतांमध्ये वाढ होऊ शकते.

दोन्ही पक्ष एकत्र येत महा आघाडी निर्माण करुन भाजपला जोरदार लढत देऊ शकतात. वंचित महाविकास आघाडीमध्ये आल्यास राज्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो. भाजपने ठाकरेंना घेरण्याची तयारी केली असली तरीही त्यांनीही कंबर कसली आहे. मात्र, यामध्ये आता खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोगामध्ये आहे, त्याचा निकाल काय येतो याकडेही लक्ष असणार आहे. ऋतुजा लटके यांच्या रुपाने ठाकरे यांना पहिला आमदार मिळाला आहे, त्यामुळे शिवसैनिकांना नक्कीच बळ मिळाले आहे, मात्र, भाजपचे डाव ठाकरेंची रणनिती यामुळे मुंबई महापालिका गाजणार यात शंका नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT