Ajit Pawar : राजकारण पेटलं ; 'मविआ' तुलना औरंगजेबाशी ; अजितदादा संतापले, म्हणाले..

Ajit Pawar : अमोल मिटकरी, ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Ajit pawar Latest Marathi News
Ajit pawar Latest Marathi NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ajit Pawar : प्रतापगड किल्ल्यावर आज शिवप्रताप दिनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी केलेल्या बंडाची तुलना केंद्रीय पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी छत्रपती शिवाजी यांच्या आग्र्याच्या सुटकेशी केली आहे. यावरुन आता राजकारण पेटलं आहे.

मंगल प्रभात लोढा यांनी हे विधान करताना महाविकास आघाडीची तुलना औरंगजेब यांच्याशी केली आहे,यावरुन महाविकास आघाडीतील नेते संतप्त झाले आहेत. विरोधीपक्षनेते अजित पवार, आमदार अमोल मिटकरी, ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Ajit pawar Latest Marathi News
Mangal Prabhat Lodha : प्रतापगडावर नवा वाद ; भाजपच्या मंत्र्यांने मुख्यमंत्री शिंदेंची केली शिवरायांसोबत तुलना

"शिवाजी महाराज यांची तुलना आपण कुणाशी करतो आहे, याचा काही ताळमेळ राहिलेला नाही. 'या'नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे. या वाचाळवीरांना आवरा," अशा शब्दात अजित पवारांनी सुनावलं. ते माध्यमांशी बोलत होते.

"औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना रोखून ठेवलं होतं, पण शिवाजी महाराज स्वराज्यासाठी बाहेर पडले, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील कोणीतरी रोखलं होतं, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले," असे विधान मंगलप्रभात लोढा यांनी केले. त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळात पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी लोढा यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरे गटाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी शिवप्रताप दिनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतापगडावरील उपस्थितीवरुन त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा मुख्यमंत्री शिंदे यांना अधिकार नाही, अशी टीका राऊतांनी केली आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

 Firing Case
dharashiv visit
Supriya Sule on Ajit Pawar Plane Crash Probe
Live Update 2
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com