Eknath Shinde Ayodhya Tour Sarkarnama
विश्लेषण

Eknath Shinde Ayodhya Tour : मुख्यमंत्री शिंदे अयोध्या दौऱ्याने काय साधणार? 'ही' आहेत दौऱ्यामागची पाच कारणं..

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ९ एप्रिलला अयोध्येत पोहचणार आहेत.

Ganesh Thombare

Shivsena : शिवसेनेच्यावतीने (शिंदे गट) अयोध्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. आज (दि.७ एप्रिल) ठाणे आणि नाशिकमधून एक-एक ट्रेन अयोध्येच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. उद्या हे शिवसैनिक अयोध्येत दाखल होतील. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ९ एप्रिलला अयोध्येत पोहचणार आहेत.

अयोध्येच्या दिशेने शिवसैनिकांच्या रेल्वेगाड्या रवाना झाल्या, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: उपस्थित होते. मात्र, शिंदेंच्या या अयोध्या दौऱ्यामागची नेमकी कारणं काय आहेत? या दौऱ्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे काय साधणार? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहेत.

शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याचा अर्थ काय?

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. तसेच त्यांच्या बरोबर शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आणि शेकडो शिवसैनिक आहेत. त्यामुळे या दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला अर्थ प्राप्त झाला आहे.

शिंदेंनी अयोध्या दौऱ्याचे टायमिंग साधलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. आगामी विधानसभा, लोकसभा आणि महापालिकेच्या निवडणुकींच्या बरोबर आधी ते अयोध्या दौऱ्यावर जात असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी बरोबर टायमिंग साधलं, अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दौऱ्यामागे हिंदुत्वाचं राजकारण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. मात्र, त्यांच्या अयोध्या दौऱ्यामागे हिंदुत्वाचं राजकारण असल्याचं बोललं जात आहे. तसेच शिवसेना पक्ष आणि नाव दोन्हीही शिंदेंना मिळाल्यानंतर आता हिंदुत्वही आपल्याकडेच आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न या दौऱ्यामागे असून आगामी निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचं राजकारण या दौऱ्यामागे असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

राष्ट्रीय स्तरावर स्वतःचा चेहरा प्रस्तूत करणं?

एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्ष आणि नाव दोन्हीही आहे. त्यामुळे एवढा मोठा पक्ष असल्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन राष्ट्रीय स्तरावर स्वतःला प्रस्तूत करण्याचाही हा प्रयत्न आहे का? असा सवालही काही जणांकडून करण्यात येत आहे.

ठाकरेंकडून हिंदुत्व काढून घेण्याचा प्रयत्न?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे. तसेच त्यांचे अयोध्यामध्ये जंगी स्वागत करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाकरेंकडून शिवसेना शिंदेंना मिळाल्यानंतर आता हिंदुत्वही काढून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

(Edited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT