Supreme Court Hearing News Sarkarnama
विश्लेषण

Supreme Court Hearing : बहुमत चाचणीपूर्वीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा का दिला? युक्तीवादात सिब्बलांनी दिले उत्तर...

मागील आठवड्यात झालेल्या सुनावणीत शिंदे गटाचे वकिल हरीश साळवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला गेला होता.

Vijaykumar Dudhale

नवी दिल्ली : राज्यपालांच्या (Governor) हेतूबाबत शंका यावी, या पद्धतीने निर्णय त्या काळात घेतले गेले, त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बहुमत चाचणीपूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा (CM) राजीनामा दिला, असे विधान ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी युक्तीवादात केले. (Why did Uddhav Thackeray resign before the majority test? Answered by Sibal in argument)

मागील आठवड्यात झालेल्या सुनावणीत शिंदे गटाचे वकिल हरीश साळवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला गेला होता, त्यामुळे ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी राजीनाम्याबाबत भाष्य केले.

सुप्रीम कोर्टाने अपात्र आमदारांवर कारवाई करण्यास १२ दिवसांची स्थगिती दिली हेाती. त्यामुळे २७ जून २०२२ रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने आपत्रतेची कारवाई थांबली गेली. त्यामुळे या अपात्र आमदारांवर अपात्रतेची कारवाई होत नाही आणि राज्यापालांचे निर्णय, यामुळेच पुढे काय होणार, हे माहिती असल्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, असेही सिब्बल यांनी सांगितले.

आसामाला गेलेल्या आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय झाला असता तर विधानसभा अध्यक्ष निवडीचा निकाल वेगळा लागला असता. गुवाहाटीला बसून एका पक्षाचा व्हीप कसा बदलला जाऊ शकतो. विधीमंडळ पक्षाचे बहुमत जरी आले तर राजकीय पक्षावर दावा करता येत नाही. शिंदे गटाने पक्षाची बैठक घेतली नव्हती. ती बैठक त्यांनी १८ जुलैला घेतली. त्याच्या दुसऱ्या दिवशी ते पक्षावर दावा सांगण्यासाठी निवडणूक आयोगात गेले. त्यासाठीच त्यांनी ही बैठक घेतली होती का? असा सवालही सिब्बल यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT