EX. MLA Charan Waghmare, Raju Karemore Sarkarnama
विश्लेषण

Charan Waghmare VS Raju Karemore: तेलंगणाचं गुलाबी वादळ भिडणार लाल बावट्याला; नाना पटोलेंसह दोन आजी-माजी आमदारांचे होणार मोजमाप

Gram Panchayat Election : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे दिवाळीपूर्वीच निवडणुकीचे फटाके फुटणार आहेत.

अभिजीत घोरमारे

Bhandara : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा केल्यामुळे आता दिवाळीपूर्वीच निवडणुकीचे फटाके फुटणार आहेत. येत्या ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यात भंडारा जिल्ह्यातील ६६ तर गोंदियातील चार ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचा फड रंगणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात वर्चस्वासाठी धावाधाव करणाऱ्या आमदारांचा आपल्या मतदारसंघातील गाव शाबूत ठेवण्यासाठी कस लागणार आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या तोंडावरील या ग्रामपंचायतीच्या निवडणुका खऱ्या अर्थाने आमदारांची परीक्षाच मानली जात आहे. या निवडणुकीच्या दृष्टीने गावात कुणाचा दबदबा कायम आहे, हे देखील निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.

भंडारा जिल्ह्यात ६६ ग्रामपंचायती व २१ सदस्याच्या रिक्त पदासाठी ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या ६६ ग्रामपंचायती पैकी सर्वाधिक ५८ ग्राम पंचायती या मोहाडी तालुक्यातील आहे. त्यामुळे आमदारकी लढवू पाहणारे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार लाल दुपट्टाधारी राजू कारमोरे,'बीआरएस' नेते गुलाबी दुपट्टाधारी चरण वाघमारे यांची थेट परीक्षा आहे. आपल्या मतदारसंघातील गाव शाबूत ठेवण्यासाठी कस लागणार आहे.

एकमेकांचे राजकीय वैरी तसेच एकमेकांचे जुने कट्टर विरोधक मानले जाणारे आजी आमदार राजू कारमोरे व माजी आमदार चरण वाघमारे याचे आपसी वाद अख्या जिल्ह्याला ठाकून आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे दोघे एकमेकांना शह, मात देण्यास आतापासून सज्ज झाले आहेत. त्यात गावागावांत दबदबा कुणाचा ? होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून या आजी-माजी आमदारांची परीक्षा होणार आहे.

दुसरीकडे भाजप-काँग्रेस आणि शरद पवार गट या दोघांच्या वादात आपलं "उल्लू सिधा" करतांना दिसणार आहे. त्यामुळे होणारी निवडणूक प्रदेशाध्यक्ष पटोलेंसह आजी-माजी आमदाराचे मोजमाप करणारी ठरणार आहे. विशेष म्हणजे दिवाळी ९ नोव्हेंबरपासून सुरू होत असली निकाल ६ नोव्हेंबरला जाहीर होणार असल्याने खऱ्या अर्थाने राजकीय फटाकेही दिवाळीपूर्वीच फुटणार आहेत. या फटाक्यांची वात कोण पेटवणार, हे लवकरच दिसणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT