
Satara BJP News : रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट मिळाली आहे. त्या अत्यंत चांगल्या अधिकारी आहेत. त्यांच्या नियुक्तीला काँग्रेस किंवा सुप्रिया सुळेंनी विरोध करून काही उपयोग नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात चांगल्या अधिकाऱ्यांना साइड पोस्टला टाकले. त्यांच्यावर खटले भरले. मात्र, आमच्या सरकारने मेरीटवर आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना पुन्हा चांगली पोस्ट देण्याचा योग्य निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी आज कराडला माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, चांगल्या सरकारी अधिकाऱ्यांना महाविकास आघाडी सरकाराने Mahavikas aghadi मुख्य पोस्टवरून बाजूला करून साइड पोस्टला टाकले. काही अधिकाऱ्यांवर खटले भरले. काही अधिकाऱ्यांवर वॉच ठेवण्याचा प्रकार केला.
मात्र, आमचे सरकार येताच आम्ही मेरीटवर आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना पुन्हा चांगलं काम देऊन योग्य निर्णय घेतला आहे. साइट ट्रॅकवरील अधिकारी मेन विभागात घेऊन त्यांना चांगल्या पोस्टवर आणले आहे. रश्मी शुक्ला या निष्कलंक अधिकारी असून, त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. त्यांची नियुक्ती योग्यच आहे.
त्यामुळे त्यांच्या नियुक्तीला काँग्रेस किंवा सुप्रिया सुळेंनी विरोध करून काहीही उपयोग नाही, असे सांगून ते म्हणाले, देशाची संस्कृती आठ हजार वर्षांपूर्वीची आहे. हिंदू संस्कृती मंदिर, मशिद, बुद्ध विहार लष्कराच्या ताब्यात देणे कधीही मान्य करणार नाही. धार्मिक भावना वेगवेगळ्या असतात. अशा अधिष्ठानांबद्दल प्रकाश आंबेडकरांनी असे बोलणे योग्य नाही.
दहा खासदार अजून पाठवा, बच्चू कडूला आव्हान देणं सोप नाही, असे आव्हान कडूंनी भाजपला दिले. त्यावर ते म्हणाले, बच्चू कडू आमचे मित्र आहेत. त्यांना आमचा कुठलाही त्रास नाही. त्यांना सोबत घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत. त्यांना अजूनही चांगल्या मतांनी निवडून आणू.
सरकार घाबरल्यामुळे पत्रकारांवर धाडी टाकल्या जात आहेत, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. त्यावर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार व राज्य सरकार जे काही करेल, त्याच्या विरोधात लिहिणे हा सामनाचा धर्म झाला आहे. कोणत्याही गोष्टीचे पुरावे मिळाल्यावर चौकशी होणारच. कोठे विदेशी फंडिंग होत असेल, राज्यातील, देशातील वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न होत असेल, अशावेळी त्याचे ठोस कारण असल्याशिवाय सरकार अशी कारवाई करणार नाही.
Edited By Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.