मतदारसंघाचा सर्वांगीण विकास, हाच माझा ध्यास- बाबासाहेब पाटील

मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून, समाजातील प्रत्येक घटक विकसीत झाला पाहीजे यासाठी आग्रही असल्याचे मत अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघांचे राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांनी गावभेटी दरम्यान व्यक्त केले. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास असल्याचेही त्यांनी सांगितले.
Ahmedpur Chakur Congress NCP Candidate Babasaheb Patil Visits Villages
Ahmedpur Chakur Congress NCP Candidate Babasaheb Patil Visits Villages
Published on
Updated on

अहमदपूर : मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून, समाजातील प्रत्येक घटक विकसीत झाला पाहीजे यासाठी आग्रही असल्याचे मत अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघांचे राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांनी गावभेटी दरम्यान व्यक्त केले. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास असल्याचेही त्यांनी सांगितले.

बाबासाहेब पाटील यांनी मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली आहे. विरोधकांचा समाचार घेतांनाच आपण केलेल्या आणि भविष्यात करणार असलेल्या विकासकामांची माहिती ते मतदारांना देत आहेत. गावभेटी दरम्यान, मतदारांशी संवाद साधतांना बाळासाहेब पाटील म्हणाले, ''विद्यमान आमदारांनी पिक विमा संदर्भात शेतक-यांच्या बाजूने कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघातील अनेक शेतक-यांना पिक विमा मिळू शकला नाही, आणि प्रचंड नुकसान झाले. याबरोबरच मतदारसंघात रस्ते, पाणी, वीज यासारख्या मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. तालुक्‍यात कोणताही मोठा उद्योग उभारला गेला नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळत नाही, परिणामी मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. याउलट आपण मतदारसंघात विविध सहकारी संस्थांचे जाळे विणले असून, या माध्यमातून अनेक जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.''

आपल्याजवळ अहमदपूर-चाकूरकर विधानसभा मतदारसंघाचा विकास आराखडा तयार असून, या माध्यमातून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मतदारांनी संधी द्यावी, असे आवाहन देखील पाटील यांनी केले.
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com