दादा तुम्ही कितीही करा हल्ला ,मजबूत आमच्या दानवेंचा किल्ला 

भोकरदन : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांची हल्लाबोल यात्रा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील बंगल्यासमोर येणार असे समजल्याने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बुधवारी दुपारी दानवेंच्या बंगल्यासमोर शक्ती प्रदर्शनासाठी जमले होते. पण हा मुकाबला झालाच नाही.
Danve-Pawar
Danve-Pawar
Published on
Updated on

भोकरदन  : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांची हल्लाबोल यात्रा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील बंगल्यासमोर येणार असे समजल्याने भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बुधवारी दुपारी दानवेंच्या बंगल्यासमोर शक्ती प्रदर्शनासाठी जमले होते. पण हा मुकाबला झालाच नाही. 

त्याचे झाले असे, अजित पवार हे मंगळवारी (ता. 23) जालना येथे मुक्कामी होते. बुधवारी सकाळी (ता. 24) अजित पवार जाफराबाद येथे हल्लाबोल मोर्चासाठी गेले होते. 12 ते 3 मोर्चा आटोपला.

त्यानंतर अजित पवार जालन्याकडे येणार होते. जाफराबादहून जालन्याला येण्यासाठी दोन रस्ते आहेत. पहिला रस्ता आहे देऊळगावराजा मार्गे आणि दुसरा रस्ता आहे भोकरदन मार्गे. भोकरदन येथे खासदार रावसाहेब दानवे यांचा हायवेवरच बंगला आहे.

  
सोशल मिडियावरील फिरणाऱ्या मेसेजमधून अजित पवार भोकरदनमार्गे जालन्याला परत जाणार, असा संदेश आला. दुपारची वेळ असल्याने भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते दानवेंच्या भोकरदन येथील कार्यालयात बसलेले होते.

अजितदादांचा परतीचा दौरा भोकरदनमधून होणार असा समज झाल्याने भाजपचे शे-दीडशे पदाधिकारी कार्यकर्ते हायवेवरील रावसाहेब दानवे यांच्या बंगल्यासमोर जमले. अजित पवार यांचा वाहनांचा ताफा कधीही या बंगल्यासमोर येऊ शकतो म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी घोषणा सुरू केली. 

"अजितदादा तुम्ही कितीही करा हल्ला, मजबूत आमच्या दानवेंचा किल्ला,'' अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी सुमारे तासभर परिसर दणाणून सोडला. खूप वेळ झाला तरी अजितदादांच्या वाहनांचा ताफा काही येईना. त्यामुळे कार्यकर्त्यांनी फोनाफोनी केली.

तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून असे कळाले ,की अजितदादा आणि त्यांच्या वाहनांचा ताफा जाफराबादहून भोकरदनमार्गे न येता परस्पर टेंभुर्णी-देऊळगावमार्गे जाऊन जालन्याला पोहोचले आहे. त्यानंतर मग दानवे समर्थकांनी या शक्तीप्रदर्शनाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल करीत हल्लाबोलला प्रत्युत्तराचा ऐनवेळी ठरवलेला कार्यक्रम संपवला.
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com