अंजली दमानिया यांचे लाखमोलाचे घड्याळ हरवले, सापडले ! 

अंजली दमानिया यांचे लाखमोलाचे घड्याळ हरवले, सापडले ! 

औरंगाबाद : प्रसिध्द सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे तब्बल पावणे दोन लाखांचे घड्याळ हॉटेलच्या खोलीतून चोरी झाले. पण नंतर पोलिस येताच सर्च ऑपरेशनमध्ये चक्क घड्याळच सापडले. 

आधी रॅकमध्ये घड्याळ ठेवले पण नंतर ते गादीखाली दिसल्याने लाखामोलाच्या घड्याळाला पाय फुटलेच कसे ? असा संशय व्यक्त होत आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंजली दमानिया (रा. विजयश्री दुर्ग, सांताक्रुझ) या वैयक्तिक कामासाठी सोमवारी (ता. तीन) शहरात आल्या होत्या. निराला बाजार येथील हॉटेल पर्लमध्ये खोली क्रमांक 104 मध्ये त्या मुक्कामी थांबल्या. सोमवारी रात्री नऊ वाजता त्यांनी हॉटेलात प्रवेश केला होता. चेकइननंतर मंगळवारी (ता. चार) सकाळी स्वच्छतागृहात जाताना त्यांनी त्यांचे लॉगीन्स वॉच या विदेशी कंपनीचे एक लाख 73 हजारांचे घड्याळ रॅकमध्ये ठेवले होते. 

सकाळी साडेनऊ ते दहादरम्यान खोलीत चेकआऊट झाले व अंजली दमानिया यानंतर हॉटेलातून बाहेर पडल्या, परंतु त्या घड्याळ घालायच्या विसल्या. सायंकाही चारच्या सुमारास दमानिया यांना हातात घड्याळ नसल्याचे लक्षात आले. त्यांनी पुन्हा हॉटेलमध्ये येऊन घड्याळाबाबत व्यवस्थापनाकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांना घड्याळ नसल्याचे सांगण्यात आले. महागडे घड्याळ चोरी झाल्याने त्यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

कसे फुटले पाय? 
हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेज पाहणीत दमानिया यांच्या खोलीत सफाई कामगार व वेटर जाताना दिसते. त्यानंतर पाच जणांची पोलिसांनी चौकशी केली. यात तिघांच्या घराची मंगळवारी झडती घेतली. परंतु, पोलिसांना रिकाम्या हाती यावे लागले. प्रकरण अंगलट येईल म्हणून चोरणाऱ्यानेच घड्याळ खोलीत आणुन ठेवल्याची बाब सुत्रांनी सांगितली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com