अर्जुन खोतकर 'देखणे'... बबनराव, तुम्हीही देखणेच...! 

दिलखुलास दाद
अर्जुन खोतकर 'देखणे'... बबनराव, तुम्हीही देखणेच...! 

औरंगाबाद : जालना शहरात रंगलेल्या 62 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी मनोगत व्यक्त करताना अर्जुन खोतकर यांचा 'देखणे'असा उल्लेख केला. त्यावर त्यांच्या हातातील माईक घेत तुम्हीही तितकेच देखणे असल्याची दिलखुलास दाद खोतकर यांनी लोणीकरांना दिली.

राज्यातील राजकीय परिस्थिती आणि शिवसेना-भाजपमधील रुंदावत चाललेली दरी पाहता खोतकर- लोणीकर यांनी एकमेकांचे केलेले कौतुक पाहून त्यांचे समर्थक मात्र सुखावले असणार एवढे मात्र निश्‍चित. 

जालना शहरात सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे संयोजकपद पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भुषवले आहे. या स्पर्धेच्या देखण्या उद्घाटन सोहळ्यास विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, बबनराव लोणीकर यांनी हजेरी लावली. मनोगत व्यक्त करण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांना आमंत्रित करण्यात आले. 

लोणीकर यांनी सुरुवातीलाच राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा उल्लख करत त्यांना 'लाडके, देखणे आणि तडफदार' अशी विशेषणे लावली. लोणीकर यांच्या मागच्या बाजुने स्टेजवरच्या व्यवस्थेकडे कटाक्ष टाकणारे खोतकर अचानक लोणीकर यांच्याकडे वळाले. खोतकर यांनी लोणीकर यांच्या हातातील माईक घेत तुम्हीही तितकेच देखणे आहात अशी दिलखुलास दाद दिली. 

आपल्या लहानपणी एका गावाहुन दुसऱ्या गावी जाताना मल्लांच्या बलोपासनेचे दर्शन व्हायचे. दंड बैठका करणाऱ्या मल्लांचे हे चित्र आता दुर्मिळ होत चालले असल्याची खंत उद्घाटक हरिभाऊ हागडे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. ही परंपरा जोपासण्यावर भर देण्याची गरज असल्याचे सांगतांनाच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'महाराष्ट्र केसरी' झालेल्या मल्लांना थेट पोलीस उपअधिक्षक पदावर तिघांची निवड केल्याची आठवण या निमित्ताने करून दिली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com