
छत्रपती संभाजीनगर : मी सर्वसामान्य घरातला उमेदवार असून, परिस्थितीची जाण आहे. जनेतेने संधी दिल्यास सेवा, सुरक्षा आणि विकासासाठी कटीबद्ध राहील. तरुण व्यसनाधीन नाही तर उद्योगाकडे वळले पाहिजे. त्यासाठी स्वतः व्यवसाय वाढीसाठी नाही तर लोकहित आणि समाजसेवेसाठी साथ द्या, असे आवाहन महाविकास आघाडीचे मध्यचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी केले.
खोकडपुरा, अजबनगर, गांधीनगर, कैलासनगर भागात पदयात्रेस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला यावेळी ते बोलत होते. प्लॉटिंग बळविणे हा आमचा पिंड नसून, बेघर लोकांना हक्काची घरे देण्यासाठी लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक काळात लोक आर्थिक आमिष दाखवून आपला पवित्र मतदानाचा हक्क हिरावून घेतील. मात्र आपल्या कामाचा, हक्काचा निष्ठावंत उमेदवार निवडून द्या, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
ही निवडणूक महाराष्ट्र राज्याच्या प्रतिष्ठेची आहेत. त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा लढा आपल्याला जिंकायचा आहेत. सर्वसामान्य लोकांनी ही निवडणूक हातात घेतल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहे. गद्दारी गाडण्याची योग्य वेळ 20 नोव्हेंबर रोजी असून, गदारीचा डाग कायमचा पुसून टाकण्याची विनंती थोरात यांनी केली.
यावेळी भारतीय कामगार सेनेचे राज्य संयुक्त सरचिटणीस प्रभाकर मते पाटील, उपजिल्हा प्रमुख आनंद तांदूळवाडीकर, श्रीरंग आमटे पाटील, विधानसभा संघटक गोपाळ कुलकर्णी, संपर्क संघटक सुनीता आऊलवर, सहसंपर्क संघटक सुनीता देव, शिवसेना उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, युवासेनेचे सहसचिव धर्मराज दानवे, माजी नगरसेवक संजय रिडलॉन, नारायण जाधव,उपशहरप्रमुख शेख रब्बानी,
सतीश कटकटे, नारायण कानकटे, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटक नलिनी बाहेती, नलिनी महाजन, शहरसंघटक सुनीता सोनवणे, उपशहर संघटक विजया पवार, विभागसंघटक कांता गाढे पाटील, शाखाप्रमुख रणजित दाभाडे, बापू हिवाळे, बाळासाहेब उधाट संजय तांबे, रोहित गायकवाड, जय बनकर, पवन कुदळे, श्रावण गायकवाड, श्याम कुदळे, ऋषिकेश गायकवाड, अनुज गायकवाड, यशराज दानवे, युवराज दानवे, रवी बत्तीसे, गोकुळ डुगलज, पराग जाधव, सुभाष राजपूत, विनय बक्षी, अनंत केदाम, शिवलिंग जैस्वाल, शाम डिडोरे, महेश गायकवाड, राजू बनकर, आदित्य चोपडे आदीची उपस्थिती होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.