धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पुढाकार घेणार- बाबासाहेब पाटील

चाकूर येथील यशवंत मंगल कार्यालयात धनगर, हटकर समाजाचा मंगळवारी (ता. 15) मेळावा झाला.
Babasaheb-Patil-
Babasaheb-Patil-
Published on
Updated on

अहमदपूरः धनगर-हटकर समाजाला आरक्षण देऊ असे सांगून युती सरकारने या समाजाची फसवणूकच केली आहे. मात्र या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुढाकार घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्‍वासन राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांनी दिले.

चाकूर येथील यशवंत मंगल कार्यालयात धनगर, हटकर समाजाचा मंगळवारी (ता. 15) मेळावा झाला. या मेळाव्यात आघाडीचे उमेदवार बाबासाहेब पाटील यांना समाजाच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला. 

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पाटील म्हणाले, मतदारसंघातील एकाही गावचा रस्ता व्यवस्थीत नाही, गावांना पुरेसा पाणीपुरवठा केला जात नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी जैसेथे आहेत. युवकांच्या हाताला काम नाही अशा अनेक संकटात सध्या हा मतदारसंघ सापडला आहे.

त्यामुळे पुढील काळात सर्वांना सोबत घेऊन मतदारसंघाच्या विकासासाठी ताकदीने झटावे लागणार आहे. उद्योग उभारणी करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा याला प्राधान्य देण्यात येईल. या शिवाय धनगर-हटकर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न देखील प्रलंबित आहे. युती सरकारने या संदर्भात समाजाची फसवणूक केली असली तरी आपण भविष्यात या समाजाच्या आरक्षणासाठी पुढाकार घेऊ अशा ग्वाही देखील बाबासाहेब पाटील यांनी यावेळी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com