२० हजार मतांच्या आघाडीनंतर धनंजय मुंडे समर्थकांचा जल्लोष सुरु

पहिल्या फेरीपासून सुरु झालेली धनंजय मुंडे यांची आघाडी कायम राहत १२ व्या फेरीअखेर २० हजार ९०० मतांनी आघाडी मिळाल्यानंतर धनंजय मुंडे समर्थकांनी जल्लोष सुरु केला आहे. परळीत भाजपच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यात लढत झाली.
Pankaja-Dhananjay
Pankaja-Dhananjay
Published on
Updated on

परळी  : पहिल्या फेरीपासून सुरु झालेली धनंजय मुंडे यांची आघाडी कायम राहत १२ व्या फेरीअखेर २० हजार ९०० मतांनी आघाडी मिळाल्यानंतर धनंजय मुंडे समर्थकांनी जल्लोष सुरु केला आहे.  परळीत भाजपच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यात लढत झाली. 

अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत शेवटचे दोन दिवस कथीत क्लीपभोवती फिरले. त्यानंतरही आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. दरम्यान, गुरुवारी मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून धनंजय मुंडे आघाडी घेत राहीले. फेरिगणिक त्यांची आघाडी वाढतच होती. १२ व्या फेरी अखेर धनंजय मुंडे यांना २० हजार ९८१ मतांची आघाडी मिळाली. धनंजय मुंडे यांना ६२ हजार २४२ मते मिळाली. तर, भाजपच्या पंकजा मुंडे यांना ४१ हजार २६१ मते मिळाली. मतांची मोठी आघाडी मिळाल्यानंतर परळी शहरात धनंजय मुंडे समर्थकांनी जल्लोष करायला सुरुवात केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com