Maratha Reservation : तातडीने बैठक बोलवा; अन्यथा, लढा उभारणार... संभाजीराजे आक्रमक

मराठा आरक्षणासंदर्भात Maratha Reservation आपली भूमिका स्पष्ट करताना शिंदे Eknath shinde, फडणवीस Devendra Fadanvis सरकारला Government इशारा दिला.
Eknath shinde, Sambhajiraje Chhatrapati
Eknath shinde, Sambhajiraje Chhatrapatisarkarnama

संभाजीनगर : मराठी समाजातील गरीब, वंचितांना आरक्षण मिळाण्यासाठी मराठा समाजाला सामाजिक मागासत्व सिध्द करावे लागेल. त्यासाठी रिव्हिव पिटिशनच्या मागे लागले पाहिजे जी वर्षे झाले तरी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला नाही. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांना सर्वकाही माहिती आहे, त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर बैठक बोलवावी, अन्यथा स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून लढा उभारावा लागेल, असा इशारा कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.

संभाजीनगर येथे संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना शिंदे, फडणवीस सरकारला इशारा दिला. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे ही समाजाच्या बाजूने आहेत. त्यांनी आता आरक्षण देण्याबाबत भूमिका घ्यायला हवी.

Eknath shinde, Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje : 'महाविकास'नेही मंत्रिमंडळ विस्तारास महिना घेतला होता.... संभाजीराजे

गरिब, वंचित मराठ्यांना आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे. १९०२ मध्ये शाहू महाराजांनी त्याकाळी बहुजनांना आरक्षण दिले होते. जोपर्यंत मराठा समाज आपले सामाजिक मागासत्व सिध्द करत नाही तोपर्यंत त्याला आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी चर्चेला मी तयार आहे. आरक्षण प्रश्नावरून शिंदे सरकारला अल्टिमेटम देण्याची वेळ आली आहे का, याविषयी संभाजीराजे म्हणाले, आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यांनी आरक्षण रद्द केलेले आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया पुन्हा करावी लागेल.

Eknath shinde, Sambhajiraje Chhatrapati
Satara : उदयनराजे फडणवीसांना भेटताच... शिवेंद्रसिंहराजेंचा पत्ता कट झाल्याची चर्चा...

समाजाला सामाजिक मागासत्व सिध्द करावे लागेल. त्यासाठी मागासवर्गीय आयोग नेमून ही प्रक्रिया परत सुरू करावी लागणार आहे. सामाजिक मागास आहे हे सिध्द करताना रिव्हिव पिटिशनच्या मागे लागले पाहिजे. जी सर्वोच्च न्यायालयात आहे, वर्षे झाले त्याचा निकाल झालेला नाही. त्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सामाजिक मागासत्व सिध्द करता येणार नाही. आरक्षण प्रश्नी मी उपोषण केले त्यावेळी एकनाथ शिंदे स्वतः तेथे आले होते.

Eknath shinde, Sambhajiraje Chhatrapati
Video: आर्थिक निकषांवर आरक्षण देऊन टाका; उदयनराजे भोसले

त्यांनीच मागण्या मान्य करत माझे उपोषण सोडले. त्यावेळी ते वेगळ्या सरकारमध्ये होते. मागच्या सरकारने मागण्या पूर्ण केलेली नाही. आता या सरकारने अधिकारी वर्गाला बोलवा काय ठरलें होते ते पहावे. शिंदे, फडणवीसांना सर्व काही माहिती आहे. त्यांनी आता तातडीने बैठक बोलवावी.

Eknath shinde, Sambhajiraje Chhatrapati
छत्रपतींच्या अपमानाचा बदला...; संभाजीराजे समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी

मुख्यमंत्र्यांना जाब विचारायची वेळ आली आहे का, या प्रश्नावर ते म्हणाले, काही कारण नाही, कारण त्यावेळी ज्या गोष्टी त्यांनी मान्य केल्या होत्या त्या त्यांना माहिती आहेत. मी पुन्हा परत जाऊन त्या गोष्टी सांगणे म्हणजे मुर्खपणाची गोष्ट ठरेल. त्यांनी लवकरात लवकर बैठक बोलवावे, नाही तर स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून लढा उभारावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com