कोल्हापूर : राज्यसभा निवडणूकीच्या निकालाचे राज्यभरात पडसाद उमटू लागले आहेत. पुरेसे संख्याबळ असतानाही शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्या आहेत. शिवसेनेच्या पराभवानंतर कोल्हापूरात संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करण्यात आली आहे.
राज्यसभेच्या निकालानंतर संभाजीराजेंनी शनिवारी शिवसेनेवर निशाणा साधणारे ट्वीट केले होते. त्यानंतर आता त्यांच्या समर्थकांनी थेट शिवसेना भवनसमोरच समर्थकांनी बॅनरबाजी करत शिवसेनेला डिवचलंं आहे. ''छत्रपतींचा अपमानचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार,'' असा मजकूर या बॅनरवर आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला. पण, राजेंनी शिवसेनेत प्रवेश करा अशी अट शिवसेनेकडून घालण्यात आली. या अटीला संभाजीराजे यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. या सर्व घडामोडींमुळे राजेंनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली.
त्यानंतर शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली पण त्यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या पराभवानंतर संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांनी कोल्हापूरात शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी करत डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ''शिवरायांचा गनिमी कावा वापरून छत्रपतींचा अपमानचा बदला घेणाऱ्या सर्व आमदार मावळ्यांचे आभार. यासोबतच 'राज्यसभा तो झाकी है, स्वराज्य में 2024 अभी बाकी है' असाही मजकूर ही या बॅनरवर लिहीण्यात आला आहे.
दरम्यान, संभाजीराजेंनी समर्थकांच्या बॅनरबाजीनंतर पुन्हा ट्विट केले आहे. समर्थकांनी माझ्या प्रेमापोटी जे फ्लेक्स लावले, त्यांच्या प्रेमाचा मी आदरच करतो. मात्र कोणत्याही पक्षाला खुन्नस म्हणून त्यांच्या कार्यालयासमोर अशी काही कृती करणे, हे माझ्या तत्वात बसत नाही. राजकारणात येणार असलो तरी 'स्वराज्य'ला तत्वांची बैठक असेल. असा संदेश आपल्या समर्थकांना दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.